• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MPSC Exam : MPSC चा 5707 जागांसाठी तडकाफडकी मोठा निर्णय, आता संयुक्त पूर्व परीक्षा…लाखो विद्यार्थ्यांना थेट फायदा!

August 5, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण 5707 पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अर्ज भरण्यास ही मुदतवाढ दिली आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टवरून १० ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत असेल.

उमेदवारांच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI द्वारेच शुल्क भरावे लागणार आहे.

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गासाठी वयोमर्यादा मोजण्याचा आधार अर्जाच्या अंतिम दिनांकानुसार म्हणजे १० ऑगस्ट २०२६ राहणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार भरती प्रक्रियेत नवीन संवर्गांचा समावेश करून एकूण ५७०७ पदांसाठी भरती होणार आहे.

दरम्यान, आता एमपीएससीने घेतलेल्या या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या परीक्षेची तयारी करत असणाऱ्यांना तांत्रित अडचणीमुळे अर्ज भरता आले नव्हते. आता उमेदवारांना हे अर्ज दाखल करता येणार आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in