• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Moises Henriques: ऑस्ट्रेलियन खेळाडूने देश सोडला आणि आता या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार

June 30, 2026 by admin Leave a Comment


ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मोइसेस हेनरीके याने पोर्तुगालसाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन, धोनी आणि सेहवाग असा संघ असताना त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलं होतं. पण आता पोर्तुगालकडून खेळणार आहे. हेनरिके ऑगस्टमध्ये सब रिजनल पात्रता फेरीत पोर्तुगालकडून मैदानात उतरेल. (PC-GETTY IMAGES)

मोइसेस हेनरिके टी20 वर्ल्डकप पात्रता फेरीत पोर्तुगालकडून खेळेल. पोर्तुगालकडून खेळण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटत असला तरी त्या मागे कारण आहे. मोइसेस मुळचा पोर्तुगालचा आहे. त्याचा जन्मही तिथेच झाला होता. पण त्याचे आई वडील काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात आले आणि येथेच हेनरिकेने क्रिकेटचे धडे गिरवले. (PC-GETTY IMAGES)

मोइसेस हेनरीकेने वर्ष 2009 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. ऑस्ट्रेलियासाठी तो तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला. हेनरिकने ऑस्ट्रेलियासाठी 4 कसोटी, 16 वनडे आणि 24 टी20 सामने खेळला आहे. कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये त्याने प्रत्येकी दोन अर्धशतकं ठोकली आहेत. (PC-GETTY IMAGES)

मोइसेस हेनरिके आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. पाच संघांकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरकडून खेळला आहे. हेनरिकेने 1000 धावा आणि 42 विकेट घेतल्या आहेत. (PC-GETTY IMAGES)

मोइसेस हेनरिके 2017 पासून गंभीर क्लिनिकल डिप्रेशनशी सामना करत होता. त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, देशांतर्गत सामन्यानंतर कारमधून घरी परतत असताना खूप रडू आलं. त्यावेळेस गाडी खांब्याला ठोकावी असा विचार आला होता. पण सुदैवाने त्याने तसं केलं नाही. (PC-GETTY IMAGES)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वात मोठी बातमी! मी पक्ष सोडलाच नाही, सचिन अहिर यांचे धक्कादायक विधान; नेमकं काय म्हणाले?
  • Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
  • सलमानसमोर अशी हिंमत होईल का? रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागणारा अभिनेता ट्रोल
  • सचिन अहिर यांनी सोडली साथ, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
  • IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा झंझावात कुठे पाहता येणार, आणि किती वाजता सामना सुरु होणार? पाहा Schedule

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in