• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MNS Support CJP Protest : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेचे उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, आज संध्याकाळापासूनच..

July 23, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंनी येत्या 26 जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर हा मार्च निघणार आहे. ठाकरे गटाने या मोर्चात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. भाजपच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेले दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा जोरदारपणे सक्रीय झाले आहेत. गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी दोघे पुन्हा कामाला लागले आहेत. एक सरकारविरोधात जनमत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण भाजपच्या विस्ताराचा सर्वाधिक फटका या दोघांनाच बसला आहे.

26 जुलैला आंदोलन होईलच. पण त्याआधी मनसेने एक नवीन मोहिम सुरु केली आहे. ‘एक सही पाठिंब्याची’ असं या मोहिमेचं नाव आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानात ही मोहिम राबवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी या मोहिमत सहभागी व्हावं असं आवाहन मनसेने केलं आहे. “विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी पक्षातर्फे नाही तर एक नागरिक म्हणून या मोहिमेचं आयोजन केलं आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे समर्थक असाल किंवा विरोधी पक्षाचे हा विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. कुठलही राजकारण यात नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
  • कंगनाला पोस्टाने… बाबा रामदेव यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने चिमटा काढलाच, पुन्हा वाद भडकणार?
  • Ritu Tawde : त्या बाईच्या हातात बाळ होतं, रिक्षा मिळत नव्हती, त्यावेळी रितू तावडेंनी..सतत टोकाची टीका झेलणाऱ्या मुंबईच्या महापौरांचं कौतुकास्पद काम
  • Raksha Bandhan: फडणवीसांपासून राज ठाकरेंपर्यंत… राजकीय नेत्यांनी असा साजरा केला रक्षाबंधन; पाहा खास क्षण
  • Raksha Bandhan: दाऊदला राखी बांधणारी बॉलिवूड अभिनेत्री कोण? आदित्य पांचोलीच्या वक्तव्याने नेटकरीही चकीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in