• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mirzapur: ‘मिर्झापूर’च्या शोमध्येच राडा, मुन्ना-गुड्डूच्या चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी, बेल्ट-लाथा-बुक्क्यांनी हाणलं; व्हिडीओ व्हायरल

September 6, 2026 by admin Leave a Comment


Mirzapur The Movie: बहुचर्चित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ अखेर 4 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. वेब सीरिजपासूनच या फ्रँचायझीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा आणि रवि किशन यांसारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाची मोठी चर्चा आहे. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांमध्ये चक्क थिएटरमध्येच हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं.

या व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण एकमेकांशी जोरदार भांडताना दिसत आहेत. या हाणामारीत लाथा-बुक्क्यांसोबत बेल्टचाही वापर झाल्याचं दिसून येत आहे. काही प्रेक्षक परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार, ही हाणामारी मुन्ना भैया आणि गुड्डू पंडित यांच्या चाहत्यांमध्ये झाल्याचा दावा केला जात आहे. ‘मिर्झापूर’च्या कथानकात या दोन्ही पात्रांमध्ये असलेली कट्टर दुश्मनी प्रेक्षकांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळे पडद्यावरची ही स्पर्धा काही चाहत्यांनी अक्षरशः थिएटरमध्ये आणल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण किंवा संबंधित व्यक्तींची ओळख अधिकृतपणे समोर आलेली नाही.

पहा व्हिडीओ-

More action in the theatre than in the entire Mirzapur movie. 🤣 pic.twitter.com/ZtveGkJoH5

— Byomkesh (@byomkesbakshy) September 5, 2026

दरम्यान, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांत जगभरात 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचं समजतंय. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. वेब सीरिजच्या लोकप्रियतेनंतर ‘मिर्झापूर’ फ्रँचायझी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आली आहे. कालीन भैया, गुड्डू आणि मुन्ना या लोकप्रिय पात्रांमुळे चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रचंड उत्सुकता होती.

‘मिर्झापूर: द मूव्ही’ या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी आणि रवी किशन यांसारखे कलाकार पुन्हा एकदा ‘मिर्झापूर’च्या विश्वात परतले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या असून, अनेकांनी याला वेब सीरिजपेक्षाही दमदार म्हटलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ट्राय-सिरीजमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला? ICC चा नवा प्लॅन समोर
  • जगात मोठी खळबळ! अनेक देशांनी घेतले धाड धाड निर्णय, थेट अमेरिकेतील..
  • Pakistan Cricket : टीम इंडियाला हरवलं, मोठा जल्लोष केला; पण त्यानंतरच आमची वाट लागली, मोहम्मद यूसुफचा मोठा खुलासा
  • महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पाैळ प्रकरणात वडिलांचा झोप उडवणारा खुलासा, थेट मोठी मागणी..
  • Bigg Boss 20: बादशाहच्या घटस्फोटावर सलमान खान स्पष्टच बोलला; कोणालाही तो अधिकार देऊ नका..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in