
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 24 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात गेल्या हंगामातील उपविजेता पंजाब किंग्स विरुद्ध भिडणार आहे. पंजाब किंग्सचाही हा पाचवाचा सामना असणार आहे. पंजाब किंग्स या मोसमात आतापर्यंत अजिंक्य आहेत. पंजाबने आतापर्यंत खेळलेलेल्या 4 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाबचा केकेआर विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 4 सामन्यानंतर 7 गुण आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईला विजयी सुरुवातीनंतर सलग 3 पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. मुंबईकर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
Leave a Reply