
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. सामन्यातील पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टाकला जाणार आहे. त्याआधी वानखेडे स्टेडियममध्ये 7 वाजता टॉस करण्यात आला. मुंबईच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आम्हीही फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता असं टॉस गमावल्यानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणला. त्यामुळे आता हार्दिकचा फिल्डिंगचा निर्णय किती योग्य ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वानखेडे स्टेडियममधील 2026 वर्षातील महत्त्वाची आकडेवारी
वानखेडे स्टेडियममध्ये 2026 वर्षांत आतापर्यंत एकूण 11 पैकी 7 सामन्यांत 200 पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत. तसेच या मैदानातील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 194 इतकी आहे. हे स्टेडियम आकाराने लहान असल्याने 200 पेक्षा अधिक धावा सहज होतात. तसेच 2026 वर्षात या वानखेडेत 11 पैकी 6 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झालाय. तर 5 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारलीय. त्यामुळे आता 12 व्या सामन्यात कुणाच्या बाजूने निकाल लागतो निकालानंतरच स्पष्ट होईल.
मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं. तर चेन्नईने काही बदल केलेत. मात्र महेंद्रसिंह धोनी याचं कमबॅक झालेलं नाही. क्रिकेट चाहत्यांना रोहित-धोनीच्या कमबॅकची प्रतिक्षा होती. मात्र चाहत्यांची निराशा झालीय. रोहितचा दुखापतीमुळे सलग तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. तर महेंद्रसिंह धोनीला दुखापतीमुळे 19 व्या हंगामात एकही सामना खेळता आलेला नाही.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), सर्फराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुरजनप्रीत सिंग आणि मुकेश चौधरी.
Leave a Reply