
लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या सुमठाणा इथं एका युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सुनील बिरादार ( वय 42) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवल्याचा दावा, मयत सुनील बिरादार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने संतापलेल्या नातेवाईक आणि मराठा आंदोलकांनी मृतदेह उदगीर ते लातूर रस्त्यावरच्या येरोळमोड येथे रस्त्यावर आणून ठेवत रास्तारोको केला आहे.
आत्महत्या केलेल्या सुनील बिरादार यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, तसे लेखी पत्र द्या, अशी मागणी नातेवाइकांसह आंदोलकांनी केली आहे. याघटनेमुळे सध्या येरोळमोड या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील गेली दहा दिवस झाले पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या 11 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे त्यांचं उपोषण सुरूच आहे. या दरम्यान सराकरी शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच त्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जिथपर्यंत समाधानकारक निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.
बातमी अपडेट होत आहे..
Leave a Reply