
दिवंगत नेते अजितदादांच्या अपघातावरून अद्याप अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी अजिदादांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल झाला नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या अपघातावरून राजकारण करू नका, अशा सल्ला दिला होता. रोहित पवार यांनीही सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं समर्थन दिलं होतं. आता या वादात मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली आहे. सोन्यासारखा माणूस म्हणत त्यांच्यासोबत नेमकं काय झालं? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोमवारी दहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत जाऊन उपोषण करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी जरांगे यांनी सरकारला 12 तारखेंपर्यंत अवधी दिला आहे. आता 12 सप्टेंबरनंतर जरांगे हे मुंबईला जाण्याविषयी निर्णय घेणार आहेत. जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना अजितदादांची आठवण काढली. मनोज जरांगे म्हणाले, अजितदादांचं काय झालं, याबाबत कोणालाच मेळ नाही. त्यांचा रिपोर्ट किती दिवसांनी येणार, तपास लागणार आहे, असे सांगण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांनो किती दिवस नीच औलादीसारखं जगताय…तुमचा सोन्यासारखा माणूस गेला. राजकारणापलीकडे जाऊन समजून घ्या, अजितदादांबाबत काय झालं असेल’. आता मनोज जरांगे यांनी सवाल उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जरांगेंनी मुंबईत जाऊन उपोषण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याबाबतच मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘इतर मराठ्यांनी जेवण पाण्याची तयारी करा. आरक्षण मिळेपर्यंत महाराष्ट्र बंदच ठेवा. तुम्हाला केस अंगावर पडण्याची भीती वाटते, तर रात्रीचंही शांततेत आंदोलन करायचं. विशेष म्हणजे ज्यांना केस अंगावर पडण्याची भीती वाटते, त्यांनी माझ्यासोबत येऊ नका. रक्त सांडवल्याशिवाय तेजस्वी इतिहास होत नाही. महाराष्ट्रात मराठा समाज मोठा आहे, मग त्यांचा माज का उतरवत नाही? हा माझा प्रश्न आहे. त्यांचा 12 तारखेला माज उतरवायचा आहे. राजकीय नेते, व्यापााऱ्यांच्या मागे केस लावून उद्ध्वस्त करायला लागला आहे. आपल्याला ईडी लावून.. मग्रुर शासक परवडणारा नाही’.
Leave a Reply