
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. एका अपघातग्रस्ताची भेट घेण्यासाठी ते आले होते. “अपघात झाला, त्याची तब्येत आता खूप चांगली आहे. मी त्याला भेटलो आहे. अपघातग्रस्त किरण भगत यांनीच सांगितलं नियोजित दौरा पूर्ण करा, दौरा थांबवू नका” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “मला कागदपत्र ज्याने दिलं, त्याचं नाव स्वामी आहे. मी आता नाव जाहीर करतो. संबंधात-संबंधात फरक आहे, देवेंद्र फडवणीस आणि बावनकुळे यांचे संबंध काय आहेत? मला माहित नाही” असं मनोज जरांगे पाटील बोलले. जरांगे पाटील हे डिफेंडर गाडीमधून फिरतात, यावर आरोप होत आहेत. त्यावर जरांगे पाटील बोलले.
“मी समाजाचं काम करतो. समाजाला मायबाप मानलं आहे. माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असे म्हणतात. तुम्हा कोणाला गाडी कोण देतं का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. “माझे खूप उकरू लागले आहात. माझ्यावर खूप लक्ष आहे यांचं” असं जरांगे पाटील बोलले. मनोज जरांगे पाटील आज सांगली जिल्ह्यातल्या विटा शहरात आले होते. तिथून ते मायनीच्या दिशेने रवाना झाले.
उलटे दिवस फिरले तर लय अवघड होईल
“सर्वांनी समाजासाठी आत्मीयतेने काम करावं. अपघात झाल्यानंतर कार्यक्रम रद्द करण्याचा विचार होता, पण आमचा सहकारी म्हणाला दौरा पूर्ण करा. तुम्ही जर आमच्या माग लागले ना तर तुमचा देव्हारा करेल लक्षात ठेवा. समाजाला न्याय मिळावा म्हणून आम्ही काम करत आहे. तुम्ही जाणून बुजून आमच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करता आहात” असं मनोज जरांगे म्हणाले. “खोट्या केसेस करणाऱ्या लोकांना आम्ही मोजत नाही. आज सत्ता तुमच्या हातात आहे, पण उलटे दिवस फिरले तर लय अवघड होईल. मी आता बावनकुळे यांच्या फार मागे लागणार आहे. अधिकाऱ्यांनी प्रवक्ता होऊ नये, आपलं वेगळं स्टेटस असतं. आता नवीन एक पत्र काढला आणि तो अधिकारी बावनकुळे यांच्या बाजूने बोलत आहे” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
माझ्या मस्तकात बसला तर त्याचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही
“असल्या अधिकाऱ्यांनी माझ्या नदी लागू नये जर का माझ्या मस्तकात बसला तर त्याचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही. रद्द केलेले प्रमाणपत्र आपल्याला पुन्हा पाहिजे,त्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. या 29 ऑगस्टला पूर्ण आरक्षण देणार आहे, सगळ्या अंमलबजावणी घेणार. प्रत्येक घरात जाऊन समाज बांधवाना जागं करा आणि ही लढाई जिंकून द्यायची” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
Leave a Reply