
“माझ्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. मी आज तुमच्याशी बोलू शकतोय ते सलायनमुळे. आज आपण समाजासाठी जीव जाळतोय. आपल्या विरोधात जळणारी प्रवृत्ती डोळ्यासमोर ठेवा” असं मनोज जरांगे पाटील उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले. “ही अंतिम निर्णयाची शेवटची लढाई आहे. शेवटची आहे म्हटल्यावर काय करायचं हे माहित असलं पाहिजे” असं जरांगे पाटील बोलले. मुंबईला जायचं की अंतरवलीत आंदोलन करायचं? असं त्यांनी समोरच्या गर्दीला विचारलं. त्यावर समोरच्या बाजूने मुंबई-मुंबई अशा घोषणा सुरु होत्या. मुंबईला जाण्यासाठी एकमत आहे का? यावर समोरच गर्दी मुंबई, मुंबई ओरडत होती. ‘ठीक आहे मग मुंबईला जायचं फायनल’ असं जरांगे पाटील म्हणाले.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply