• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi : आयपीएमध्ये सिक्स मारले पण नेट्समध्ये वैभव सूर्यवंशीचा खऱ्या जसप्रीत बुमराहशी सामना झाला, तेव्हा त्याला कळलं बुमराह क्या चीज हैं

September 12, 2026 by admin Leave a Comment


भारताचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह फिट होऊन पुन्हा नेटमध्ये परतला आहे. नेट्समध्ये त्याच्या भेदक गोलंदाजीचा कोवळ्या वैभव सूर्यवंशीला सामना करावा लागला. टीम इंडिया सध्या अरुण जेटली स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरूद्धच्या टी20 सीरीजची तयारी करत आहे. बुमराहने नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव केला. त्यावेळी समोर होता वैभव सूर्यवंशी. आयपीएलमध्ये वैभवने बिनधास्त फलंदाजी केली होती. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने सिक्स मारलेला. वैभवने आयपीएलचा यंदाचा सीजन आपल्या फलंदाजीने गाजवला. जगातल्या टॉप बॉलर्सना त्याने झोडून काढलं. यात जसप्रीत बुमराह सुद्धा होता. याच बुमराहशी वैभवचा नेट्समध्ये सामना झाला.

आयपीएलमध्ये बुमराहची गोलंदाजी खेळणं तुलनेने वैभवसाठी सोपं होतं. पण तेच नेट्समध्ये बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं वैभवसाठी परीक्षेसमान होतं. गुड लेंथ टप्प्यावर चेंड़ू टाकून बुमराहने वैभवला अनेकदा चकवलं. त्यानंतर जसप्रीतने वैभव विरुद्ध आपल्या घातक यॉर्कर अस्त्राचा सुद्धा वापर केला. जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशीला अनेकदा चकवलं. त्याला चूक करायला भाग पाडलं. फिट होऊन परतलेला जसप्रीत बुमराह किती घातक आहे, ते त्याने वैभवला दाखवून दिलं.

पहिल्या चेंडूपासून तो तुटून पडतो

बुमराहच्या एखाद-दुसऱ्या चेंडूवर वैभवने फटके मारले. पण नेट सत्रातील बहुतांश वेळ बुमराहने वैभववर वर्चस्व गाजवलं. बुमराहची गोलंदाजी खेळणं वैभवसाठी एकापरिक्षेसमान होतं. सामान्यत: वैभवला गोलंदाजांवर हुकूमत गाजवायची सवय आहे. पहिल्या चेंडूपासून तो तुटून पडतो. पण नेट्समध्ये मात्र वैभव बुमराहच्या बॉलिंगवर दबकूनच खेळत होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह टीमबाहेर होता.

सेमीफायनलमध्ये यश ठाकूरच्या गोलंदाजीवर हल्लाबोल

बुमराहसोबत नेट सेशनमध्ये अर्शदीप सिंह, नितीश कुमार रेड्डी यांनीही गोलंदाजी केली. अर्शदीपने सुद्धा आपल्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशीला अडचणीत आणलं. यश ठाकूरने सुद्धा 15 वर्षाच्या वैभवला अनेकदा चकवलं. याच वैभवने दुलीप ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये यश ठाकूरच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता. जसप्रीत बुमराहकडून आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ही सुंदर अभिनेत्री ट्रान्सजेंडर? प्रश्न उपस्थित होताच समोर येऊन सगळं सांगितलं; सर्वांनाच केलं गप्प!
  • जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव, हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट
  • Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, कसं वापरायचं?
  • ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधून दर महिन्याला किती व्हायची गोलीची कमाई ? आता थेट Youtuber
  • ना कोहली ना रिकी पाँटिंग, या खेळाडूची कॅप्टन म्हणून निवड, द्रविडने का निवड केली?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in