
पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसह राज्यातले मराठी बांधव आता आंतरवाली सराटीला येऊन मुंबईकडे रवाना होतील का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असे मोठे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. 29 ऑगस्ट रोजीचे आंदोलन हे मुंबईला होतंय की? काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याची भावना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांच्या या घोषणेने मुंबईकरांना यापूर्वी वाशीच्या वेशीवर झालेले आंदोलन आणि आझाद मैदानातील आंदोलनाची आठवण झाली आहे.
डिफेंडर कारवरून सुरू असलेल्या आरोपांना उत्तर
विरोधकांना कोणी काही मदत करत नाही त्यामुळे माझ्यावर टीका केली जाते मी डिफेंडर गाडी घेऊन जी फिरत आहे, ती कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. मला उद्घाटन करायला सांगितले आणि गाडी पाठवून दिली म्हणून त्या गाडीतून मी फिरत आहे, असे उत्तर त्यांनी टिकाकारांना दिली आहे. स्वामी या अधिकार्याने राजकारणात पडू नये आपलं काम चोखपणे करावं, असे त्यांनी सुनावले.
सरकारचा माज उतारणार
जी चूक केली त्याबद्दल बोला, लोकांचा रोष कमी होईल. कुणबी प्रमाणपत्र द्या.आता सरकारचां तिरस्कार येत आहे. तो वाढू देऊ नका, शेतकरी मुस्लिम ,ओबीसी मध्ये तिरस्कार असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. सरकारने मराठा समाजाला प्रचंड हिणवले आहे. 3 वर्षात किती मोर्चे झाले आणि या काळात काय दिले असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे. मला अनेक मराठा नेत्याच्या फोन येतो, आमदार,खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटते असे सांगतात, राणेंसारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, याचे स्वागत आहे. सरकारचा माज उतरवणार असल्याचे ते म्हणाले.
मनोज जरांगेंचे भव्य स्वागत
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा दौरा सुरू आहे. कवठेमंकाळ बोरगाव यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये स्वागत व सभा झाल्या आहेत. आज पश्चिम महाराष्ट्र दौराचा समारोप करत असताना सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे यांचे भव्य दिव्य पद्धतीने स्वागत होत आहे. या स्वागतासाठी ढोल ताशा झांज पथक आणि 30 जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात येत आहे अशा प्रकारचा अशा प्रकारचे स्वागत पहिल्यांदाच मनोज जरांगे यांचे केले जात असल्याचे बोलले जात आहे.
Leave a Reply