• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!

August 9, 2026 by admin Leave a Comment


Mamata Banerjee Convoy Attack : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेहमीच चर्चेत असतात. हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक खासदार, आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा नवसंजीवनी यावी यासाठी त्या राज्यभर फिरत आहेत. लोकांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील हलिशहर येथे दौऱ्यावर असताना बॅनर्जी यांच्या ताफ्यावर लोकांनी हल्ला केला आहे. त्यांच्या कारवर बूट भिरकावण्यात आले आहेत. सोबतच त्यांच्या कारच्या दिशेने चिखलफेकही झाली आहे. या घटनेनंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. लोकांनी त्यांच्या ममता बॅनर्जी यांच्या गाडीवर चिखल आणि चप्पल, बूट फेकले आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in