• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Major League Cricket: एकाच टी20 सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही, 5 मोठ्या विक्रमांमुळे आश्चर्य

July 16, 2026 by admin Leave a Comment

मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात धावांचा वर्षाव झाला. हा सामना वॉशिंग्टन फ्रीडम आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क यांच्यात खेळला गेला. या सामन्यात तीन फलंदाजांनी शतक ठोकलं. असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून निकोलस पूरन, तर वॉशिंग्टन फ्रीडमकडून स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिस गॉसने शतक ठोकलं. (Photo: X)

वॉशिंग्टन फ्रीडम आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात एकूण 536 धावा झाल्या. यात वॉशिंग्टन फ्रीडमने 270 तर मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने 266 धावा केल्या. टी20 क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा आहेत. सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आहे. आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांच्या मिळून 549 धावा झाल्या होत्या.  (Photo: X)

वॉशिंग्टन फ्रीडम आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात एकूण 536 धावा झाल्या. यात वॉशिंग्टन फ्रीडमने 270, तर मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने 266 धावा केल्या. टी20 क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा आहेत. सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आहे. आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांच्या मिळून 549 धावा झाल्या होत्या. (Photo: X)

मेजर क्रिकेट लीग 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात एकूण 51 षटकार मारले गेले. टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही सामन्यात 50 हून अधिक षटकार मारले गेले आहेत. यापूर्वी आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामन्यात एकूण 42 षटकार मारले गेले होते.  (Photo: X)

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने एका डावात 29 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाने एका डावात मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदाने 37 षटकार तर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने 33 षटकार मारले. तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेपाळे मंगोलियाविरुद्ध 27 षटकार मारले आहेत. (Photo: X)

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने एका डावात 29 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाने एका डावात मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदाने 37 षटकार, तर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने 33 षटकार मारले. तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेपाळे मंगोलियाविरुद्ध 27 षटकार मारले आहेत. (Photo: X)

मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम नोंदवला गेला. स्टीव्ह स्मिथ आणि अँड्री गॉस यांनी तिसऱ्या विकेटसाठी 241 धावांची भागादारी करत रेकॉर्ड नोंदवला. यापूर्वी सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरच्या नावावर हा विक्रम होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत या दोघांनी 213 धावांची भागीदारी केली होती.  (Photo: X)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in