• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पावसाचा जोर वाढणार..

July 24, 2026 by admin Leave a Comment


राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला. यवतमाळ, नंदूरबार, अकोला, नाशिक, बुलडाणा, अमरातवी, वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्यात पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत पाऊस पडत असल्याने पूर आला. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. मुंबईतील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. काही धरणे ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत. मराठवाडा, विदर्भ सर्व दूर हा पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

खडकवासला धरणातून रात्री 9.30 वाजता 9 हजार 405 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण साखळीत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पावसाचा विसर्ग केला जातोय. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे धरण साखळीतील पाणी पातळीत वाढ होतंय. खडकवासला धरण गेल्या महिन्याभरात भरले. पुण्यात सतत पाऊस सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गोदावरीचे पाणी निफाड तालुक्यातील सायखेडा गावात शिरले. सायखेड्यातील 30 व चांदूरमधील 35 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू. नदीकाठच्या दुकानदारांनाही स्थलांतराचे प्रशासनाचे आदेश आहेत. रात्री पूरपाण्यात वाढीचा इशारा; दवंडी देत प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन केले जातंय. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मोठा पूर आला. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोठा इशारा नागरिकांना देण्यात आला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in