
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर अंतरवाली सराटीत तयारीला वेग आला आहे. निर्णायक आंदोलनासाठी ते सज्ज झाले आहेत. अंतरवालीत मंडप तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सरकार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. MPSC च्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्यानंतर त्यातील सुरस कथा समोर आल्या. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मार्किंग पॅटर्न फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे. आज रक्षाबंधन आहे. सीमेवर आणि राजकीय रक्षाबंधन दिसेल.
मुंबई महापालिकेवर शिंदे सेनेचा महापौर बसण्याची चर्चा समोर आली आहे. याविषयीचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. गणेश मंडळांना बाप्पााच्या मूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. तर डीजेच्या परवानगीवरूनही कार्यकर्त्यांना यंदा कसरत करावी लागणार असल्याचे दिसते. नेपाळमध्ये महाप्रलय आल्याने जनजीवन उद्धवस्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांना राज्यात आणण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथं वाचू शकता.
Leave a Reply