
गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीते यांनी नकार दिला आहे. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीतील नेत्यांची भेट घेतली होती. मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल असं ते म्हणाले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याची गोकुळ गीते यांची माहिती आहे. तर दुसरीकडे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत पर्यावरणपूरक आणि व्यवहार्य धोरण निश्चित करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि बृहन्मुंबई महापालिकेकडे केली. समितीने पीओपीच्या उंच मूर्तीवर तात्काळ सरसकट बंदी घालण्याऐवजी विसर्जनानंतर मूर्ती संकलित करणे, त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply