• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mahakal Temple : उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात आता भस्म आरतीसाठी भरावे लागणार इतके पैसे, ऑनलाइन बुकिंगच्यावेळेतही बदल

April 16, 2026 by admin Leave a Comment


Mahakal Bhasm Aarti : महाकालच्या दर्शनाला दररोज लाखो भाविक जात असतात. यात भस्म आरतीला उपस्थित राहण्यासाठी भाविक विशेष प्रयत्न करतात. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात श्री महाकालेश्वर मंदिर आहे. महाकालची भस्म आरती आपल्या मिळावी अशी इथे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा असते. आतापर्यंत आपण अनेक सेलिब्रिटी बाबा महाकालच्या दर्शनाला गेल्याचं पाहिलं आहे. दरदिवशी भाविक महाकालच्या भस्म आरतीसाठी रांगेत उभे राहून परवानगी घेतात. पण मंदिर समितीने आता ऑफलाइन भस्म आरतीची सुविधा समाप्त केली आहे. आतापर्यंत भस्म आरती निशुल्क होती. त्यासाठी कुठलीही रक्कम आकारली जात नव्हती. पण यापुढे महाकालच्या भस्म आरतीसाठी भाविकांना 200 रुपये भरावे लागतील.

रिपोर्टनुसार महाकाल मंदिर समितीने 9 एप्रिलपासून ऑफलाइन परवानगी पूर्णपणे बंद केली आहे. आता तुम्हाला https://www.shrimahakaleshwar.mp.gov.in/ या वेबसाइटवरुन महाकाल भस्म आरतीसाठी तात्काळ बुकिंग करता येईल. सकाळी 8 वाजता पोर्टल उघडल्यानंतर बुकिंग करता येईल. जर, तुम्हाला 16 एप्रिलला बुकिंग करायची असेल, तर 15 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पोर्टल उघडताच बुकिंग करावी लागेल.

तत्काल बुकिंगमध्ये किती जणांना परवानगी?

श्री महाकालेश्वर मंदिर समितीने नव्या निर्णयानुसार 9 एप्रिलपासून ऑफलाइन भस्म आरतीची परमिशन पूर्णपणे बंद करुन टाकली आहे. तत्काल बुकिंगसाठी फक्त 300 भक्तांना अनुमती असेल. बुकिंगसाठी प्रति भाविक 200 रुपये ऑनलाइन भरावे लागतील. जो, पहिला येणार त्याला या तत्वावर तात्काळ बुकिंग मिळेल.

ऑनलाइन बुकिंगमध्येही बदल

भस्म आरतीच्या सामान्य ऑनलाइन बुकिंगमध्येही बदल करण्यात आला आहे. आधी पहिली विंडो तीन महिने आधी उघडायची. पण आता एक महिना आधी उघडेल. मे महिन्यासाठी नियमित बुकिंग विंडो 21 एप्रिलला सकाळी 8 वाजता उघडेल. जून आणि आगामी महिन्यांसाठी बुकिंग एक महिना आधी उघडेल. जूनची बुकिंग 1 मे आणि जुलैची बुकिंग 1 जून पासून सुरु होईल. दर महिन्याच्या 1 तारखेला बुकिंग सकाळी 8 वाजता सुरु होईल.

संध्या आणि शयन आरतीचे दर काय?

महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीने याआधी संध्या आरती आणि रात्रीच्या शयन आरतीमध्ये बदल केला आहे. संध्या आणि शयन आरतीसाठी ऑनलाइन बुकिंग सुरु केलेलं. प्रति व्यक्ती 250 रुपये शुल्क निश्चिचत केलं आहे. भक्तांसाठी केवळ निशुल्क चलित दर्शनाची व्यवस्था ठेवली आहे. संध्या आरतीसाठी बुकिंग पोर्टल दररोज दुपारी 12 वाजता उघडतं. आरती दर्शनासाठी अंतिम प्रवेश वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. शयन आरती बुकिंग पोर्टल दरदिवशी संध्याकाळी 4 वाजता उघडतं. दर्शनासाठी अंतिम प्रवेश वेळ रात्री 10 वाजेपर्यंत आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय?
  • 14 वर्षांचा वनवास संपला.. वाद मिटवून गोविंदाच्या पत्नीची भाचा-सुनेला मिठी, कृष्णा अभिषेक- काश्मिरासोबत व्हिडीओ व्हायरल..
  • चाबहार बंदर ठरतंय तारणहार, इराणच्या मदतीला भारतच, थेट मोठा धक्का..
  • Vinod Kambli | मागचं पुढचं काहीच आठवेना… माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; ब्रेन स्ट्रोकचा धोका
  • फक्त 3 कोटींचं बजेट अन् 450% चा तगडा नफा; सनी देओलच्या या चित्रपटाने बदललेली सर्वच गणितं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in