
बॉलिवूडमधील ‘हिरो नं.1’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता अहुजा आणि भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेदांमुळे जवळपास 14 वर्ष कटुता दिसत होती. यादरम्यान बरीच नोकझोक झाली, कृष्णा अभिषेकची मामी, सुनिता अहुजा हिने बऱ्या तिखट प्रतिक्रिया दिल्या, काही झोंबणारी विधानंही केली. ज्यावरून कॉमेडियन कृष्णाने काही रिॲक्शन्सही दिल्या. मात्र त्यांच्यातील अनेक वर्षांचा हाँ वाद आता संपताना दिसत आहे. याच कारण म्हणजे सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीो व्हायरल झालेला दिसला, ज्यात इमोशनल फॅमिली री-युनिअन पाहायला मिळालं. या व्हिडीओत सुनिता अहुजा, कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी काश्मिरा शाह ही देखील होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची खूप चर्चा झाली. कृष्णा अभिषेक आणि सुनीता आहुजा समोरासमोर येताच भावूक होतात आणि एकमेकांना मिठी मारतात. हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या लोकांसाठीही खूप खास ठरला. या भेटीनंतर गोविंदा आणि कृष्णा यांचे नाते पुन्हा पूर्वीसारखे होईल, अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.
14 वर्षांचा वनवास संपला
या व्हिडीोत सुनिताने म्हणलेलं वाक्यही खूपच चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी, सुनीताने कृष्णाला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाली, “14 वर्षांचा वनवास संपला.” आपल्या मामीचे हे शब्द ऐकून कृष्णासुद्धा भावूक झाला आणि म्हणाला, “हे आमच्यासाठी मोठं आश्चर्य होतं. त्या आज शोमध्ये सामील होतील याची आम्हाला दोघांना कल्पनाही नव्हती. होकार दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे, यासोबतच गेल्या 12 वर्षांपासून चर्चेत असलेल्या सर्व अफवांना आम्ही पूर्णविराम दिलाय.” असंही त्याने स्पष्ट केलं.
का सुरू झाला वाद, काय होतं कारण ?
अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात अनेक वर्षांपासून संवाद बंद होता, ते एकमेकांशी बोलत नव्हते. रिपोर्टनुसार, 2016 साली ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णाने केलेल्या एका विनोदामुळे गोविंदा आणि सुनीता संतापले आणि तेव्हापासून त्यांच्यातील वाद सुरू झाला. त्यामुळे, यानंतर, जेव्हा जेव्हा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांना कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आमंत्रित केले जायचे, तेव्हा कॉमेडियन कृष्णा अभिषेक शोपासून दूर राहायचा. मात्र, अनेक प्रसंगी कृष्णा अभिषेकने, मामा-मामीसोबत आपलं नातं, संबंध सुधारण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. सुनीता आहुजा यांनीही या वादावर अनेकदा उघडपणे भाष्य केलं होते. पण आता त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
बीते शिकवे खतम करो
नवीन वर्षाच्या सुरुवातीला, गोविंदाची पत्नी सुनीताने सांगितलं होतं की,गोविंदा आणि कृष्णा यांच्यात सर्व काही ठीक आहे. ती म्हणाली, “मी माझ्या मुलांवर किती काळ रागावू शकतं? जेव्हा प्रत्येकजण आपापल्या जागी आनंदी आहे, मग मी मनात कटुता का बाळगू? मला फक्त सर्व मुलांना आशीर्वाद द्यायचा आहे; ते माझ्या मुलांसारखेच आहेत.” असं ही त्या म्हणाल्या होत्या. एवढंच नव्हे दुसऱ्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्य की, “कृष्णा माझ्यासोबत, विनय, डम्पी आणि माझ्या मेहुण्याच्या मुलासोबत वाढला. माझ्यासाठी ते सर्व माझीच मुलं आहेत. मी भूतकाळातील सगळं काही विसरले आहे. सर्व मुलांनी हसावं, खेळावं आणि आनंदी राहावं, आता मला एवढंच हवंय” असं म्हणत तिने त्यांना आशीर्वाद दिला होता.
Leave a Reply