• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LSG vs RR Live Streaming : लखनौ-राजस्थान आमनेसामने,पराभवाची मालिका कोण थांबवणार?

April 21, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 32 व्या सामन्यात 22 एप्रिलला बुधवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. रियान पराग हा राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा एकूण सातवा सामना असणार आहे. राजस्थान आणि लखनौची गाडी गेल्या काही सामन्यांपासून विजयाच्या ट्रॅकवर घसरली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसमोर या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजस्थाने या मोसमात सलग 4 सामने जिंकत 8 गुणांची कमाई केली. मात्र त्यानंतर राजस्थानला ही घोडदौड कायम राखण्यात अपयश आलं. राजस्थानला सलग 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला लखनौने पहिल्या पराभवानंतर सलग 2 सामने जिंकले. मात्र लखनौने सलग 3 सामने गमावले. त्यामुळे लखनौच्या खात्यात फक्त 4 गुण आहेत. त्यामुळे लखनौसमोर सलग चौथा तर राजस्थानसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे राजस्थान आणि लखनौपैकी कोणता संघ मैदान मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना कधी?

लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामना बुधवारी 22 एप्रिलला होणार आहे.

लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना कुठे?

लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, लखनौ इथे होणार आहे.

लखनौ विरुद्ध हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस उडवण्यात येईल.

लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे मॅच  मोबाईलवर लाईव्ह पाहता येईल.

लखनौ-राजस्थानपैकी भारी कोण?

राजस्थान लखनौ विरुद्ध वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. राजस्थानने या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर लखनौने 2 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे उभयसंघातील सातव्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : आता थांबवून दाखवाच! मुंबई टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?
  • SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
  • पाळणा हलणार! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
  • PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा
  • किआचा धमाका! नवी ‘Syros’ लाँच, किंमत 27 हजारांनी कमी आणि फीचर्समध्ये मोठी वाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in