• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LSG vs KKR: लखनौ आणि कोलकात्यासाठी अस्तित्वाची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत पंत म्हणाला…

April 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ लढत आहेत. या सामन्यात विजयी संघाला पुढच्या प्रवासासाठी ताकद मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असणार आहेत. गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स संघ नवव्या, तर कोलकाता नाईट रायडर्स संघ दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुबळ्या संघांचा हा सामना होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. फक्त एक बदल केला आहे. सिद्धार्थच्या जागी लिंडे संघात येईल. आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. आम्हाला काहीतरी मार्ग शोधावा लागेल, आम्ही त्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. आम्हाला माहित आहे की इथून आम्ही या हंगामाला कलाटणी देऊ शकतो, मला पूर्ण विश्वास आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याच्या विचारात होतो. सध्या एक संघ म्हणून आम्ही कसे खेळत आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे. फलंदाजी विभागाला ते स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. त्या परिस्थितीचा अंदाज घेणे गरजेचे आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळणार आहोत. तो विजय खूप चांगला होता. नेहमी सुधारणा करणे महत्त्वाचे असते. काही चांगले सराव सत्र झाले, सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, मोहसिन खान.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे (कर्णधार), टिम सेफर्ट (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, अंगकृष्ण रघुवंशी, रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्ही जर एका बापाचे असाल तर आधी मला रोखा, तुम्ही म्हणाल तिथे… माजी सरन्यायाधीशाच्या भावानेच श्याम मानव यांना ललकारले
  • IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याचा लखनौवर सुपर विजय, असं घडलं या सामन्यात
  • Beach वर नुसरत जहाँ हीचा ग्लॅमरस अंदाज, पाण्यात अभिनेत्रीचा दिसला सिझलिंग लूक
  • IPL 2026, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्स कोलकाता सामना सुपर ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकात काय झालं?
  • या तीन गोष्टी बायकोला पण सांगू नका, चाणक्यांनी दिला सुखी संसाराचा मंत्र

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in