• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याचा लखनौवर सुपर विजय, असं घडलं या सामन्यात

April 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 155 धावा केल्या आमि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना लखनौ सुपर जायंट्सची पुरती वाट लागली. हा सामना शेवटच्या षटकात गेला. या षटकात 17 धावांची गरज असताना लखनौ सुपर जायंट्सने 16 धावा केल्या. त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यामुळे या सामन्यात काय निकाल लागणार याची उत्सुकता होती. सुपर ओव्हरमध्ये लखनौच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण त्यांना एकच धाव करता आली आणि विजयासाठी 2 धावा दिल्या. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून जिंकला.

लखनौचा डाव आणि सहा चेंडू

कोलकाता नाईट रायडर्सने सुपर ओव्हर सुनील नसरीनच्या हाती सोपवलं. लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पूर आणि एडन मार्करम ही जोडी मैदानात उतरली. पहिल्याच चेंडूवर नरीनने निकोलस पूरनला तंबूत पाठवलं. त्यानंतर शेवटची विकेट म्हणून ऋषभ पंत मैदानात उतरला. दुसऱ्या चेंडूवर पंतने एक धाव घेतली आणि मार्करमला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर मार्करमने जोरदार प्रहार केला. त्याने षटकाराच्या दिशेने फटका मारला. पण रोवमॅन पॉवेलने झेल पकडला आणि चेंडू आत फेकला. हा चेंडू रिंकूने पकडला आणि मार्करम बाद झाला. अप्रतिम झेल घेतल्याने लखनौ सुपर जायंट्सचा डाव 1 धावेवर लखनौचा खेळ आटोपला. तसेच विजयासाठी 2 धावांचं आव्हान मिळालं.

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव

कोलकात्यासमोर विजयासाठी फक्त 2 धावांचं आव्हान होतं.  कोलकात्याकडून रिंकु सिंह आणि रोवमॅन पॉवेल ही जोडी मैदानात उतरली. तर लखनौ सुपर जायंट्सने सुपर ओव्हर प्रिन्स यादवला दिलं. स्ट्राईकला रिंकु सिंह होता आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर कोलकात्याचा विजय झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ambadas Danve | ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच…
  • जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा
  • Karuna Munde | धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच… करुणा मुंडेच्या दाव्याने राजकारणात खळबळ
  • Beautiful Currency: या आहेत जगातील 5 सर्वात सुंदर नोटा, भारताचा रुपया यादीत कुठे?
  • रिक्षा- टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती; भुजबळ पहिल्यांदाच बोलले, मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in