• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG Price Today : एलपीजी गॅस सिलेंडरच्या जाणून घ्या किमती, तुमच्या शहरात कितीला आहे सिलेंडर वाचा एका क्लिकवर

June 12, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात घरगुती एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली. अगोदर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजीचा मोठा तुटवडा आहे. गेल्या काही तासांमध्ये मध्य पूर्वेत तणाव अधिक वाढला. ओमानच्या समुद्रात थेट अमेरिकेकडून जहाजांवर हल्ले केले जात आहेत. एका भारतीय जहाजावरही हल्ला झाला. त्यामुळे एलपीजीचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.  एलपीजी सिलेंडर ग्राहकांना अलीकडेच दरवाढीचा फटका बसला आहे. केंद्र सरकारने 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रूपयांनी वाढ केली. हे दर 7 जून 2026 पासून लागू करण्यात आले. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर किती आहेत, याबाबत जाणून घेऊयात.

मुंबई येथे घरगुती गॅस सिलेंडरचे दर 941.50, दिल्ली येथे 942, कोलकाता येथे 968, चैन्नई येथे 957.50, पटना येथे 1021.50, लखनऊ येथे 979.50, जयपुर येथे 954.50 इतके आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर मुंबई 3,067.50, दिल्ली 3,113.50, कोलकता 3,255.50, चैन्नई 3,283, पटना 3,400, लखनऊ 3,236 आहेत. मागील काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली.

आज सरकारकडून सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होत आहे. सरकार आणि तेल कंपन्यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता खर्च आणि तेल विपणन कंपन्यांवरील वाढता आर्थिक बोजा यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. सिलेंडरच्या किमतीमध्ये दरवाढ होत असताना देखील तेल कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत मोठा चढउतार होत आहे. त्याचाच परिणाम आहे. तेल कंपन्या यादरम्यान मोठे नुकसान सहन करत आहेत. भारताच्या शेजारी देशात स्थिती अधिक गंभीर आहे. भारत अनेक प्रयत्न करून देशात एलपीजी गॅस आणतोय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in