• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG gas cylinder : एलपीजी गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम लागू, …तर आता सिलिंडरच मिळणार नाही

May 25, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलसोबत युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर या ठिकाणी अमेरिकेनं देखील नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांमधून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जणावर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एलपीजी गॅस सिलिंडरबाबत सरकारकडून एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता ज्या लोकांच्या घरात पाइपलाइनच्या माध्यमातून नॅचरल गॅसचा पुरवठा होतो, त्या लोकांना एलपीजी गॅसचं सिलिंडर मिळणार नाहीये.

सरकारकडून आदेश जारी

सोमवारीच यासंदर्भात सरकारच्या वतीने आदेश जारी करण्यात आला आहे. आदेश जारी झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने या निर्णयाची अमलबजावणी देखील करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार आता ज्यांच्या नावावर पीएनजीचं कनेक्शन आहे, अशा लोकांना आता एलपीजीचा पुरवठा करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. याचाच अर्थ आता एकाच व्यक्तीला एलपीजी आणि पीएनजी असे दोन कनेक्शन मिळणार नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी  सरकारकडून काही अत्यावश्यक पाऊलं उचलली जात आहेत, त्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री
  • ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ‘बॉडी टॅपिंग’ कसे काम करते?
  • कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष
  • ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना
  • सकाळी उठताच करताय ‘या’ 4 चुका, सावध व्हा… वाढतोय ‘हार्ट अटॅक’चा धोका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in