• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार, 30 जून पर्यंत पटापट उरकून घ्या ही कामं

June 28, 2026 by admin Leave a Comment


30 जून 2026 ही तारीख व्यावसायिकांसोबतच नोकरदार लोकांसाठी देखील महत्त्वाची आहे. कारण 30 जून 2026 ही आर्थिक बाबींसंदर्भात आणि कर संदर्भात अनेक कामं पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. 1 जुलै 2026 पासून नवे नियम लागू होणार आहेत. जर तुम्ही 30 जून 2026 पर्यंत तुमची पेंडिग कामं पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला त्यामुळे आर्थिक दंड होण्याची तसेच तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भविष्यात काही समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. लोकांना शासकीय सेवांचा लाभ व्यवस्थित मिळावा, त्यामध्ये कोणताही खंड पडू नये, तसेच नागरिकांना शासकिय सेवेचा लाभ घेताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सरकार आपल्या वेगवेगळ्या योजनांच्या नियमांमध्ये ठराविक कालावधीनंतर काही बदल करत असते. एक जुलैपासून काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

एलपीजी गॅसची इ केवायसी

जर तुम्ही एलपीजी सिलिंडरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही एलपीजी गॅससाठी आवश्यक इ केवायसी केली नाही तर तुम्हाला एलपीजी गॅसवर मिळणारं अनुदान बंद होऊ शकतं. विशेष: जे लोकं प्रधानमंत्री उज्जवला योजना (PMUY) चा लाभ घेतात, त्यांच्यासाठी ईकेवायसी महत्त्वाची आहे. जर ईकेवायसी वेळेत झाली नाही तर तुमचं अनुदान बंद होऊ शकतं. तुम्ही तुमच्या अधिकृत गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा घरबसल्या तुमच्या मोबाईलवर देखील एलपीजी गॅसची ई केवायसी करू शकता.

आयटीआर

इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2026 आहे. मात्र 30 जून ही तारीख टॅक्स पेयर्ससाठी देखील महत्त्वाची आहे. कारण 30 जून रोजी इनकम टॅक्स डिपार्टमेंट स्क्रूटनी नोटीस जारी करण्याची शक्यता आहे.

एलपीजी गॅसचे दर – दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसचे नवे दर जाहीर केले जातात, अनेकदा दरामध्ये बदल देखील होतो. परंतु नुकतीच एलपीजी गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे यावेळी एलपीजी गॅसच्या दरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. एलपीजी गॅसचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : चार राशींच्या घरात पैसाच पैसा, 29 जूनला नशीब फळफळणार; राशीभविष्य काय?
  • AUSW vs INDW : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह सेमी फायनलमध्ये
  • गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? बोलता बोलता काय सांगितलं?
  • IND vs IRE: आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला…
  • IRE vs IND : दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची नामुष्की

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in