• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरच्या बाजूने कौल, अंजिक्य रहाणे म्हणाला की…

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील 70व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला. कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे आणि खेळपट्टी छान व चांगली दिसत आहे. क्रिकेटचा सामना खेळायचा आहे आणि आम्ही मागील सहा सामने खेळलो आहोत. येथे चांगली कामगिरी करायची आहे. मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत.’

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. पुढच्या हंगामात आम्ही अधिक चांगली कामगिरी कशी करू शकतो हे पाहू. मला वाटत नाही की आम्ही वाईट क्रिकेट खेळलो, पण निकाल बदलण्यासाठी आवश्यक असलेले क्षण आम्ही साधू शकलो नाही. आम्हाला त्या गोष्टी करायला शिकून पुढे जायला हवे. आमच्या संघात दोन बदल केले आहेत.’

केकेआर प्लेऑफमध्ये पात्र कसं ठरणार?

एकतर राजस्थान रॉयल्सने सामना गमावला तर आणि तरच कोलकाता नाईट रायडर्सला जर तरची संधी मिळेल. कोलकाता नाइट रायडर्सला 180 धावांचे लक्ष्य 13 षटकांपेक्षा कमी षटकात पूर्ण करावे लागेल. पण ही शक्यता कमी आहे, तरीही केकेआरसाठी ती एक गणितीय शक्यता आहे. तर पंजाब किंग्सच्या पुढे निघून जाईल. अन्यथा पंजाब किंग्सला प्लेऑफची संधी मिळेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, तेजस्वी दहिया (विकेटकीपर), अनुकुल रॉय, सुनील नरेन, सौरभ दुबे, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), साहिल पारख, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, माधव तिवारी, औकिब नबी दार, मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in