• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Murder Case: बस्स झाला अत्याचार…राष्ट्रीय पुरूष आयोग हवाच! केतन अग्रवाल खून प्रकरणात भाजप खासदाराची मोठी मागणी

July 4, 2026 by admin Leave a Comment


National Commission for Men : पुण्यातील केतन अग्रवाल हा तरूण भावी संसाराची स्वप्न रंगवत होता. तर त्याची होणारी पत्नी सिया गोयल त्याला संपवण्याचा डाव आखत होती. धोक्याने तिने त्याचा घात केलाच. 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून धक्का देत त्याचा जीव घेतला. या कामासाठी प्रियकर चेतन चौधरी यालाही मजबूर केले. विश्वासघात आणि भीषण कटाने समाजमन सुन्न झाले. पुरूषांवरील हे अत्याचारावर डोळे झाक करता येणार नाही असा संताप व्यक्त करत भाजप खासदाराने राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन्याची मागणी रेटली आहे. राज्यसभेतील भाजपचे खासदार अशोक कुमार मित्तल यांनी ही घटना चिंताजनक असल्याचे म्हणत जुने खासगी विधेयक समोर आणले.

पुरुषाला न्याय मिळणे कायद्यानेच अभिप्रेत

खासदार अशोक कुमार मित्तल यांनी डिसेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्यासाठी राज्यसभेत आवाज उठवला. त्यांनी याविषयीचे खासगी विधेयक सादर केले. या कामकाजाचा व्हिडिओ त्यांनी आता पुन्हा X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यांनी राष्ट्रीय पुरूष आयोगाची पुन्हा वकिली केली आहे.

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरण हे गंभीर आणि चिंताजनक आहे. याप्रकरणात निष्पक्ष, सखोल आणि निःपक्षपाती चौकशी होणे आवश्यक आहे. केतन आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. मी संसदेत राष्ट्रीय पुरूष आयोग विधेयक सादर केले होते. प्रत्येक पीडिताला न्याय, मदत आणि कायद्यानुसार समान संरक्षण मिळायला हवे, असे त्यांनी संबंधित पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुरुष सुद्धा पीडित असतो

केतनच्या खूनाच्या निमित्ताने त्यांनी पुरूषही पीडित असू शकतो. लिंगभेदावर आधारित कोणताही भेदभाव न करता, सर्वांसाठी समान न्याय मिळणे गरजेचे आहे. पुरुषांच्या आवाजाला व्यासपीठ हवे. त्यांना संस्थात्मक पाठिंबा हवा आणि कायद्याचे संरक्षण हवे असे खासदार अशोक कुमार मित्तल यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

आपमधून भाजपमध्ये

अशोक कुमार मित्तल पंजाबमधून खासदार म्हणून राज्यसभेवर आले. विधेयक सादर करताना ते आप पक्षात होते. यावर्षी एप्रिल महिन्यात राघव चड्डा यांच्या नेतृत्वात ज्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात मित्तलही होते. खासगी विधेयक मंजूर होण्याचे प्रमाण संसदेत नगण्य आहे. सरकारने अशा घटना पाहता पुरूषांच्या हक्क, न्यायासाठी आयोग स्थापन करण्याची मागणी रेटली जात आहे.

Pune Ketan Agarwal case is deeply disturbing. Ketan and his family deserve a fair, thorough, and impartial investigation, and above all, justice.

I introduced the National Commission for Men Bill in Parliament. Every victim deserves justice, support, and equal protection under… pic.twitter.com/M6ENpG1T7F

— Ashok Kumar Mittal (@DrAshokKMittal) July 3, 2026

सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी

पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर काल मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना काल वडगाव मावळ न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले. न्यायाधीश ए. एम. विभुते यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी पक्षाने दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. सुनावणीअंती कोर्टाने सरकारी पक्षाची मागणी फेटाळली आणि दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आता आरोपींकडून जामीनासाठी अर्ज दाखल केल्या जाऊ शकतो.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण…
  • बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात, एका निर्णयाने नेपाळचं दिवाळं निघणार
  • Aamir Khan Marriage : घराला लायटिंग, बसायला खुर्च्या, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात तामझाम काय? पहिला व्हिडीओ समोर; नवरी…
  • नवरा-बायकोसारखं राहू लागले, त्याला दाढी करताना पाहिलं अन्…गुपित बाहेर येताच रेल्वे ट्रॅकजवळ मिळाला मृतदेह!
  • पावसाळ्यात भारतातील या नयनरम्य सुंदर ठिकाणांना द्या भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in