• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agarwal Murder Case : जे कधीच घडलं नाही, तेच केतन अग्रवाल प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने… कोणता पुरावा येणार हाती?

June 30, 2026 by admin Leave a Comment


लोहगडावरून खोल दरीत पडून मृत्यू झालेला केतन अग्रवाल याची केस सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केतन याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना अटक केली असून काल त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात आता एक मोठं वळण आलं आहे. केतन अग्रवाल हत्याकांडात पोलिस आता आरोपी चेतन चौधरी याचं ‘गेट ॲनालिसिस’ ( (चालण्याच्या पद्धतीची न्यायवैद्यक तपासणी) करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच एआयच्या माध्यमातून केतन चौधरीचा वॉकिंग पॅटर्न तपासण्यात येणार आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि विशेषतः या उद्देशासाठी रेकॉर्ड केलेला चेतनच्या चालण्याचा व्हिडिओ यांची तुलना केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली.

जेव्हा एखादा आरोपी आपला चेहरा लपवण्यासाठी हुडी, मास्क किंवा हेल्मेटचा वापर करतो, तेव्हा साधारणपणे या तंत्राचा वापर केला जातो; पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या दिवशी लोहगडावर जाताना चेतन चौधरी याने हुडी घातली होती.

सुनावणीनंतर, न्यायालयाने आरोपी चेतन चौधरी आणि मृत केतनची होणारी पत्नी सिया गोयल यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवली. तपासाचे अनेक पैलू अद्याप तपासायचे बाकी आहेत, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं; यामध्ये किल्ल्यावरील हत्येचे नेमकं ठिकाण, डिलीट केलेला डिजिटल पुरावा हस्तगत करणे आणि मृत केतन याचा हरवलेला पासपोर्ट शोधून काढणे यांचा समावेश आहे. 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून 25 वर्षीय केतन अग्रवालला शेकडो फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप सिया गोयल (वय 20) आणि चेतन चौधरी (वय 22) यांच्यावर आहे.

पोलीस करणार गेट ॲनालिसिस

आता पोलीस चेतनला तशाच प्रकारची ‘हुडी’ (hoodie) घालून त्याच परिसरातून चालण्यास सांगण्याची तयारी करत आहेत. जेणेकरून लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि चेतन याचं चालणं याची चुलना करता येऊ शकेल. ‘” आम्ही चेतनच्या चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण (gait analysis) करण्याची योजना आखत आहोत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो हुडीने चेहरा झाकून चालताना दिसत आहे. दोन्ही फुटेजमधील चालण्याच्या पद्धती जुळतात का हे तपासण्यासाठी, त्याच्या चालण्याची तुलना नव्याने रेकॉर्ड केल्या जाणाऱ्या व्हिडिओशी केली जाईल.” असं एका पोलीस अधिकाऱ्याने न्यायालयात सांगितलं.

धक्का दिला त्या जागीची चेतन-सियाने केली होती रेकी

दरम्यान 29 जूनपर्यंत असलेली पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. केतनला ज्या विशिष्ट ठिकाणावरून खाली ढकलले जाऊ शकत होते, त्याची पाहणी करण्यासाठी आरोपींनी यापूर्वी त्या किल्ल्याला भेट दिली होती असं तपासादरम्यान निष्पन्न झाल्याचं सरकारी वकील राजश्री विरकुड यांनी न्यायालयाला सांगितलं. आणि याच मुद्द्याबाबत त्यांची कसून चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवणे आवश्यक असल्याचंही वकिलांनी न्यायालयासमोर नमूद केलं. तसंच, कट रचण्यासाठी आरोपी विविध ठिकाणी भेटले होते आणि या भेटीगाठींबाबत सविस्तर तपास करणे गरजेचे असल्याचेही सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन या आरोपींनी डिजिटल डेटाही नष्ट केला होता आणि तो पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हा डेटा हस्तगत झाल्यानंतर, त्या आधारे त्यांची सखोल चौकशी केली जाईल. सियाने दिलेल्या जबाबाच्या आधारे 28 जून रोजी लोहगडावर जाऊन सीन रिक्रिएशन करण्यात आलं होतं, आता चेतनने दिलेल्या माहितीशी पडताळणी करून याची खात्री केली जाईल. केतनची हत्या झाली, त्या घटनेच्या दिवशी, त्यावेळी दोन्ही आरोपींनी लोहागड किल्ल्यावर काही व्यक्तींशी संवाद साधला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. तसेच, प्री-वेडिंग फोटोशूटसाठी केतनसोबत बालीला जाण्याची सियाची इच्छा नव्हती, हे देखील तपासातून समोर आलं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in