• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ketan Agarwal Case: लग्झरी कार, मोठा बिझनेस, सियाने हत्या केलेला केतन अग्रवाल काय करायचा? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!

June 24, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील एका हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून सोडला आहे. जो प्रकार सुरुवातीला अपघात म्हणून सांगितला गेला, तो तपासात एक धक्कादायक हत्याकांड म्हणून समोर आला आहे. सिया गोयलने होणारा पती केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर इन्स्टाग्रामवर एक भावुक स्टोरी टाकली होती, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सिया गोयलने केतनला लोहगड किल्ल्यावर नेवून खाडीत ढकलले. ४०० मीटर खोल खाडीत पडल्यानंतर केतनने प्राण सोडले.

केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल. २६ वर्षीय केतनचे कुटुंब पुण्यात चांगले ओळखले जाते. त्यांचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. केतन या कंपनीचा डायरेक्टर होता. त्याचे कुटुंब पिंपरी-चिंचवड येथील लोधा बेलमोंडो भागात राहते. केतन अग्रवाल कुटुंबाची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. ते बांधकाम क्षेत्रातील एक नावाजलेले कुटुंब आहे. केतन कायम उत्साही, ट्रेकिंग आवडणारा आणि लग्नासंबंधी उत्साही युवक होता. कुटुंबीयांच्या मते, तो सियावर खूप प्रेम करत होता आणि भविष्याची स्वप्ने रंगवत होता.

२० वर्षीय सिया गोयलचे कुटुंब पुण्यातील बिबवेवाडी येथे राहते. केतन आणि सियाचा साखरपुडा याच वर्षी फेब्रुवारी २०२६ मध्ये झाला होता. सिया केतनशी लग्न करू इच्छित नव्हती, तरी कुटुंबीयांच्या दबावामुळे किंवा इतर कारणांमुळे ती पुढे जात होती. मात्र तिने कधीही आपल्या चेहऱ्यावर हे भाव दाखवले नाही की तिला केतनशी लग्न करायचे नाही. केतन अग्रवालच्या हत्येची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांनी सिया गोयलची तुलना सोनम रघुवंशीशी केली. सोनमनेही आपल्या नवऱ्याला हनीमूला गेल्यावर प्रियकरासोबत मिळून मारले होते. सियानेही आपल्या प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून केतनची हत्या केली.

लोक आता प्रश्न विचारत आहेत की, पुण्यातील केतन अग्रवाल अतिशय श्रीमंत, देखणा आणि सियावर प्रचंड प्रेम करणारा होता. मग सियाने असा भयंकर निर्णय का घेतला? सिया गोयलने ही पोस्ट १९ जून रोजी आपल्या वाढदिवशी शेअर केली होती, जी किल्ल्यावरून केतन पडून मरण पावल्यानंतर २४ तासांपेक्षाही कमी वेळात होती. त्यावेळी पोलिसांनी याला अपघात म्हटले. पोलिसांचे म्हणणे होते की, केतन, सिया आणि तिच्या मित्रांसोबत ट्रेकिंग करत असताना जोरदार वाऱ्यामध्ये फोटो काढताना सुमारे ४०० फूट खोल दरीत पडला.

त्यावेळी कोणालाही काही गडबड असल्याचा संशय नव्हता. या पोस्टमुळे लोकांची सहानुभूती मिळाली आणि मृत्यूला दुर्दैवी अपघात म्हणून सादर करण्यास मदत झाली. पुण्याजवळ गहुंजे येथील रहिवासी, २६ वर्षीय केतन अग्रवाल आपल्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये डायरेक्टर होता. ते सिया गोयल आणि तिच्या दोन जवळच्या मित्रांसोबत आपला आगामी वाढदिवस साजरा करण्यासाठी किल्ल्यावर गेला होता. ते अनुभवी ट्रेकर होते, यामुळे नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांना समजत नव्हते की तो इतक्या सहज कसा पाय घसरुन पडू शकतो. कुटुंबीयांच्या चिंतेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला. तपासकर्त्यांनी साक्षीदारांच्या जबान्या, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीची तपासणी केली, जी अपघाताची थिअरी खोटी ठरवणारी होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in