
Ketan Agarwal Case : आता कोणावर विश्वास ठेवायचा की नाही… हा प्रश्न केतन अग्रवाल याच्या मृ्त्यूनंतर उपस्थित होत आहे. केतन होणारी पत्नी सिया गोयल हिच्यासोबत फिरण्यासाठी पुणे येथील लोहगड किल्ला येथे गेलेला. पण त्याला कल्पना देखील नव्हती की, ज्या मुलीसोबत तो सुखी संसाराचे स्वप्न रंगवत होता, तिच केतन याची हत्या करेल. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, सिया हिने पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केला असून, बॉयफ्रेंड चेतन याने देखील गुन्हा कबूल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया हिने पोलीस चौकशीत सांगितलं की, तिला केतन याच्यासोबक लग्न करायचं नव्हतं. म्हणून सिया हिने होणारा पती केतन याची हत्या केली.
केतन अग्रवालची हत्या
रिपोर्टनुसार, सिया आणि चेतन दोघांना देखील केतन याला त्यांच्या मार्गातून बाजूला करायचं होतं. केतन एका उद्योजकाचा मुलगा होता आणि फक्त 26 वर्षाचा होता. जवळचे नातेवाईकांनी सिया आणि चेतन यांचं लग्न ठरवण्यात पुढाकार घेतलेला. सिया हिच्या मनात काही वेगळंच सुरु होतं, पण केतन, सिया सोबत आनंदी होता. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. केतन याने सिया हिचा वाढदिवस देखील आनंदाने साजरा केला. तर साखरपुड्यानंतर दोघे कायम फिरायला देखील जायचे. पण वास्तव जसं दिसत होतं, तसं बिलकूल नव्हतं…
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचं नातं
सिया आणि चेतन यांनी पोलिसांनी सांगितलं की, दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. अशात केतन याच्यासोबत सियाचं लग्न ठरल्यामुळे, केतनची हत्या केली. पोलीस चौकशीत चेतन म्हणाल्यानुसार, केतन आणि सिया यांचं लग्न झालं असतं तर, चेतन याच्यासोबत असलेले संबंध सिया हिला तोडावे लागले असते. सिया हिला देखील केतन याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे दोघांनी मिळून केतन याला मारण्यासाठी योजना केली. समोर येत असलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते.
सिया आणि केतन यांचा साखरपुडा…
सिया आणि केतन यांचा साखरपुडा मोठ्या थाटात झाला. दोघांनी ट्रेकिंग करण्याची आवड होती. म्हणून दोघे कायम फिरण्यासाठी जायचे. पण अनेकदा केतन याने चिंता देखील व्यक्त केलेली. तो वडिलांना सतत विचारायचा, सिया हिच्याबद्दल तुम्ही सर्वकाही माहिती घेतली आहे ना? पण लग्न नातेवाईकांच्या माध्यमातून होत असल्यामुळे जास्त संशय कुणी घेतला नाही.
कधी करण्यात आली चौकशीची सुरुवात
केतन याच्या अंत्यसंस्कारानंतर सिया त्याच्या आई – वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली. तेव्हा केतन याच्या बहिणी सिया हिला काही प्रश्न विचारले. त्याची उत्तरं देताना सिया गडबली आणि वादाच्या भोवऱ्यात अडकली. तोपर्यंत सर्वांना असचं वाटत होतं की, अपघातात केतन याचं निधन झालं. पण बहिणीला संशय आल्यानंतर केतन याच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर सिया हिचा मोबाईल डेटा, कॉल, अन्य रेकॉर्डची तपासणी केली… तेव्हा असं समोर आलं की, केतन याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून सिया आणि चेतन यांनी केतन याला संपवलं.
Leave a Reply