• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय

July 22, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपर लीकच्या मुद्यावरून CJPचं दिल्लीतील जंतरमंनेतेतर येथे आंदोलन सुरू आहे, अख्ख्या देशात याची चर्चा सुरू आहे. अनेक नेते, सेलिब्रिटी हेही या विषयावर आपलं मत मांडताना, तर काही जण आंदोलनात सहाभागी होताना दिसत आहेत. मात्र बॉलिवूडमधील काही कलाकारांची यावर अजूनही चुप्पीच असून अभिनेत्री कतरिना कैफनेही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र कतरिनाच्या मिकेवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. मात्र, कतरिना कैफसह काही कलाकारांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काहीही न बोलल्यामुळे कतरिनाचे काही चाहते नाराज झाले आहेत. याबाबत माहिती तिच्या एका फॅन पेजने दिली आहे. तसेच त्या फॅन पेजने ते डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

कतिरनाच्या मौनामुळे चाहते नाराज

सुमारे 70 हजार फॉलोअर्स असलेल्या इंस्टाग्राम फॅन पेज ‘katholic_fans’ च्या अॅडमिनने नाराजी व्यक्त केली आहे. या फॅन पेजने तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या आणि भारतीयांच्या प्रश्नांवर आवाज न उठवणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करणे त्यांना योग्य वाटत नाही, असं ‘katholic_fans’ च्या इंस्टाग्राम फॅन पेजच्या अॅडमिनने एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

आम्ही अनेक वर्षांपासून कतरिनाचे चाहते आहोत. अभिनेत्रीच्या कठीण काळात चाहत्यांनी तिची साथ दिली होती, आता तिनेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बोलायला हवे होते. मात्र NEET प्रकरणासारख्या गंभीर मुद्द्यावर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने आम्ही निराश झालो आहेत. याच कारणामुळे त्यांनी फॅन पेज बंद करण्याचा आणि कतरिनाला अनफॉलो करण्याचा निर्णय घेतल्याचं ॲडमिनने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.


सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या निर्णयानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी फॅन पेजच्या निर्णयाचे समर्थन करत अॅडमिनने योग्य भूमिका घेतल्याचे म्हटलं आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला कोणत्या विषयावर बोलायचे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार आहे असं म्हणत काही चाहत्यांनी कतरिनाच्या बाजूने मत मांडलं. लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य जसे सर्वसामान्यांना आहे, तसेच कलाकारांनाही आहे. त्यामुळे कोणत्याही सेलिब्रिटीवर एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर बोलण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये, असंही काही चाहत्यांचे म्हणणं आहे.

दरम्यान, कतरिना कैफने अद्याप NEET पेपर लीक प्रकरण किंवा CJP आंदोलनाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दुसरीकडे, शबाना आझमी, प्रीती झिंटा, रितेश देशमुख, सोनू सूद, सोनाक्षी सिन्हा आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका व्यक्त केली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in