• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kangana Ranaut : कंगना यांनी हे काय केलं? प्रचंड संतापून थेट मोदींच्या विरोधात भूमिका, म्हणाल्या जेन झी…

July 28, 2026 by admin Leave a Comment


Kangana Ranaut On CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात दिल्लीत झालेल्या जेन झींच्या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली. याच आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे आंदोलन आणि दबावामुळे घ्यावा लागलेला राजीनामा हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. आंदोलनाच्या काळात तरुणांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मार्गाने आपला विरोध व्यक्त केला. याच काळात सोशल मीडियावर मोदी सरकारला विरोध करणाऱ्या रिल्स, फोटो आणि व्हिडीओंचे तुफानच आले होते. यावरच आता भाजपाच्या खासदार तथा अभिनेत्री कंगना रणौत यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांनी जेन झींवर थेट गटर जनरेशन म्हणत टीका केलीय.

तरुणाईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा

सीजेपीच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना तसेच मंत्र्यांना इन्स्टाग्रावर सक्रिय व्हा, असं सांगितलं आहे. तसेच तरुणाईशी संपर्क वाढवा, असा सल्लाही दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीजेपीच्या आंदोलनामध्ये मोदी यांनी इन्स्टाग्रावर काही व्हिडीओ पोस्ट करून तरुणाईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु याच तरुणाईवर त्यांच्याच पक्षाच्या खासदार कंगना राणौत यांनी जेन झीवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी सीजेपीच्या आंदोलनात सामील असलेल्या तरुणांवर हल्लाबोल केला आहे. “आंदोलनातील तरुण हिंदू महिलांची मला खूपच लज्जास्पद वाटली. या तरुणी कोणतीही मेहनत न करता स्वत:च्या पायावर उभे न राहता स्ववलंबी असल्याचे नाटक करतात,” अशी खरमरीत टीका कंगना राणौत यांनी केली.

रिल्स पाहून मला किळसवाणे वाटत आहे

तसेच, सीजेपीच्या आंदोलनात समोर आलेल्या रिल्सवरही त्यांनी आक्षेप व्यक्त केला. मी माझ्या आयुष्यात अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार कुठेच पाहिला नाही. जेन झी आंदोलनाच्या रिल्स पाहून मला किळसवाणे वाटत आहे. जेन झी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर करतात, ते खूपच घाणेरडे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या रिल्स पाहून मला डिजिटल डिटॉक्सची गरज वाटतेय, असंही त्या म्हणाल्या.

दारू पिणे आणि अनेकांशी लैंगिक संबंध…

आजची पीढी ही पाश्चिमात्त्य संस्कृतीने प्रेरित आहे. अशा जनरेशनला मी गटर जनरेशन मानते. या पिढीकडे समाजाला देण्यासाठी काहीच नाही. त्यांचे विचार खूप भ्रष्ट आहेत. नशा करणे, दारू पिणे आणि अनेकांशी लैंगिक संबंध ठेवण्यावर या लोकांना अभिमान वाटतो, असे म्हणत त्यांनी जेन झींवर टीकेचे आसूड ओढले आहेत. दरम्यान, आता कंगना राणौत यांच्या या टीकेनंतर जेन झी नेमकं कशा प्रकारे व्यक्त होते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
  • Lucky Zodiac Signs 2026: रक्षाबंधनपर्यंत या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त धनलाभ, बुध ग्रहाकडून मिळेल शुभ परिणाम
  • हा अभिनेता स्वत:च्या लग्नात मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला, पत्नीने ठेवलेली खास अट
  • Viral Video: काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर राहतंय संपूर्ण कुटुंब, Viral Video मागील सत्य समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in