• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kalyan Crime : मालमत्तेवर डोळा, शिक्षिकेचा काटा काढला; शेजाऱ्याचाच थंड डोक्याने खुनाचा कट

July 24, 2026 by admin Leave a Comment


पैसा, संपत्तीच्या मोहापायी माणूस काहीही करू शकतो. एखाद्याचा जीव घ्यायालही लोकं मागेपुढे पाहत नाहीत, हे आजकालच्या गुन्ह्यांच्या घटनांवरून सहज दिसून येतं. असाच प्रकार कल्याणमध्ये एका शिक्षकेसोबतघडला असून संपत्तीपायी तिला चिचा जीवच गमवावा लागला. मालमत्तेच्या हव्यासापोटी एका अविवाहित शिक्षिका व विमा एजंटची थंड डोक्याने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर, मृत्यूपूर्वी आरोपींनी महिलेला जबरदस्तीने मृत्युपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर अतिशय थंडपणे तिचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरामुळे अख्खं शहरल हादरलं असून पोलिसांनी अथक तपासानंतर तीन जणांना अटक केली आहे. या खुनातील मुख्य सूत्रधार हा मृत महिलेचे शेजारी असल्याची धक्कादायक माहितीदेखील तपासात उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीत चंदनशिवे ( वय 53)असे मृत महिलेचे नाव होतं. त्या आंबिवली येथील रहिवासी असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तसेच विमा एजंट म्हणूनही त्या काम करायच्या. 15 जुलै रोजी चंदनशिवे यांचा मृतदेह मुंबई–नाशिक महामार्गालगत आढळून आला होता. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मृत शिक्षिका चंदनशिवेंचं लग्न झालेलं नव्हतं, अविवाहीत होत्या, मात्र त्यांच्याकडे बरीच मालमत्ता होती.

आरोपींचा संपत्तीवर होता डोळा

तर दिगंबर आव्हाड (48), तुषार रत्नपारखी (52), रमेश पांडे आणि नाशिकमधील संतोष जाधव अशी आरोपींती नावे समोर आली आहेत. त्यापैकी आव्हाड आणि रत्नपारखी हे चंदनशिवे यांचे शेजारी असून त्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक परिस्थितीची या दोघांना पूर्ण माहिती होती. याच माहितीचा गैरफायदा घेत आरोपींनी त्यांच्या हत्येचा कट रचला. आरोपींचा याच संपत्तीवर डोळा होता, त्याच मोहातून त्यांनी शिक्षिकेला संपवण्याचा प्लान थंड डोक्याने रचल्याचे उघड झाले आहे.

विमा पॉलिसी खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलावलं आणि घेतला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, विमा पॉलिसी खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपींनी चंदनशिवे यांना आसनगाव येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले. तेथे त्यांना धमकावलं आणि आव्हाड आणि रत्नपारखी यांना कायदेशीर वारस घोषित करणाऱ्या मृत्युपत्रावर त्यांच्याकडून जबरदस्तीने स्वाक्षरी करून घेण्यात आली. त्यानंतर आरोपींनी संगीता यांचा गळा आवळून खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिन्नर–घोटी मार्गावरील एसएमबीटी मेडिकल कॉलेजजवळ फेकून दिला.

त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्यावर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन लगोलग कसून तपास सुरू केला. मृत शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढल्याचा मागोवा घेत सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संतोष रमेश जाधव याला अटक केली. तसेच आणखी दोघांनाही याहत्येप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठीच हा कट रचल्याची माहिती दिली. या प्रकरणातील इतर आरोपींच्या भूमिकेचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र चौथा आरोपी अजून फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shweta Tiwari : आधी संताप, आता म्हणाली थँक्यू… श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे मानले आभार; काय घडलं नेमकं?
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणार का? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगून टाकलं की…
  • देवेंद्र फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
  • ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरून वडेट्टीवार यांची माफी, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काय दिला सल्ला?
  • MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही’, अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in