
रिलायन्स जिओने आपल्या कोट्यवधी यूझर्ससाठी भन्नाट ऑफर आणली आहे. कंपनीने एका वर्षासाठी ऑफर मार्केटमध्ये आणली आहे. या ऑफरमध्ये हायस्पीड डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि हॉटस्टारचे सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
कंपनीने या ऑफरमध्ये मूव्ही तिकीटावर सूटसह फ्लाइट तिकीटच्या बुकिंगवरही सूट दिली आहे. या पॅकेजमध्ये दरमहिन्याला ठरलेल्या डेटा लिमिटसोबतच 10 जीबीचा हायस्पीड डेटा अतिरिक्त दिला जातोय.
देशातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क जिओने मेगा अॅनिव्हर्सरी ऑफर आणली आहे. यात पूर्ण वर्षभरासाठी जिओहॉटस्टार मोबाईल ओटीटीचा सब्सक्रिप्शन दिला जाणार आहे.
यात हॉलीवूडचेही सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. यासह जिओ टीव्ही प्रो पॅकही मिळणार आहे. ज्यात 1000 हून जास्त टीव्ही चॅनलचा समावेश आहे. या ऑफरचा वापर जिओ टीव्ही माध्यमातून केला जाऊ शकतो. ऑफर अंतर्गत एका वर्षासाठी तुम्हाला दरमहिना 55 रुपयांचं व्हाउचर दिलं जाईल.
जिओने आपल्या या वार्षिक ऑफर दरम्यान 120 जीबी फ्री डेटा देणार असल्याचे म्हटले आहे. कंपनी तुम्हाला दर महिन्याला 10 जीबी डेटा प्री देणार. यासह जिओएआय क्लाउट अंतर्गत 50 जीबीचे स्टोरेजही दिले जाणार आहे. कंपनीने 35,100 रुपयांच्या गुगल जेमिनीचा 18 महिन्यांसाठी फ्री प्लॅन देणार. या ऑफरमध्ये 5,000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि 'नॅनो-बनाना' सारख्या विविध फीचर्सचाही समावेश आहे.




Leave a Reply