• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिवलग मित्रांचा तो चित्रपट ठरला शेवटचा; मध्यरात्री घरी परतताना नाशिकमध्ये घडले नको ते

September 6, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला. चित्रपट पाहून मध्यरात्री घरी परतणाऱ्या बुलटेची मालवाहू जीपला जोरदार धडक बसली. बुलेटवरील दोघांपैकी एकाच मृत्यू झाला. जय भवानी रस्त्यावरील जाचकनगर, सत्यम पार्कमध्ये राहणारे पीयूष मोरे आणि अनुराग दुबे हे त्यांच्या दोन अन्य मित्रांसह शुक्रवारी रात्री चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. सिनेमा संपल्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास पीयूष आणि अनुराग बुलेटवरून घरी परतत होते. पियुष दुचाकी चालवत होता. त्यावेळी हा अपघात घडला.

शिवाजीनगर परिसरात भीषण अपघात

पीयूष आणि अनुराग हे चित्रपट पाहून घरी परतत होते. शिवाजीनगर परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास अपघात घडला. बुलेटने मालवाहू जीपला जोरदार धडक दिली. त्यात पीयूष विलास मोरे याचा जागीच मृत्यू झाला. तर मित्र अनुराग दुबे गंभीर जखमी जाला. अनुराग हा सैन्यदलात कार्यरत आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्यै कैद झाला. जखमींना मदत न करता जीप चालक घटनास्थळावरून पसार झाला. पाठीमागून आलेल्या मित्रांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. पीयूष हा पदवीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. अनुराग दुबे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो सैन्यदलात नोकरी करतो.

जीपला जोरदार धडक

एका मॉलमध्ये या मित्रांनी चित्रपट पाहिला. पीयूष हा बुलेट चालवत होता. तर अनुराग मागे बसलेला होता. त्यांचे इतर मित्र दुचाकीवरून पाठीमागून येत होते. शिवाजीनगर परिसरात बुलेटची मालवाहू जीपला जोरदार धडक बसली. दोन्ही मित्र रस्त्यावर फेकल्या गेले. दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता सीसीटीव्हीमधून समोर येते. जीप चालकाने यावेळी वाहन न थांबवता, मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.

मित्रांनी तातडीने नेले रुग्णालयात

अगदी थोड्याचवेळात अनुराग, पियुष यांचे मित्र पाठीमागून आले. दोघांनाही रस्त्यावर रक्तबंबाळ पाहून त्यांनी तातडीने नातेवाईक आणि इतर मित्रांना मदतीसाठी बोलावले. या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पीयूष मोरे मयत झाला. अनुराग दुबे याच्यावर उपचार सुरू आहेत. पीयूष पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. ही बातमी समजताच जाचकनगर परिसरात शोककळा पसली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
  • Tejashree Pradhan: अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती?
  • पाकिस्तानी फॅन्सकडून भारतीय महिला क्रिकेटरबद्दल लाजिरवाणं विधान, जे म्हणालं ते ऐकून तुम्हालाही यैईल प्रचंड राग, Video Viral
  • ISRO च्या खाजगीकरणाच्या चर्चेमुळे कर्मचारी चिंतेत, चीफकडून मागितलं स्पष्टीकरण
  • Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in