• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे

May 25, 2026 by admin Leave a Comment


रिलायन्स जिओने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 448 रुपयांचा एक उत्तम रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. तुमच्याकडे जिओ प्रीपेड सिम असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. जर तुम्ही जास्त डेटा वापरत नसाल आणि चांगली वैधता देणारा प्लॅन शोधताय तर हा प्लॅन तुमच्या गरजा पूर्ण करेल. चला तर मग या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

जिओ 448 प्लॅनचा तपशील

रिलायन्स जिओचा 448 रुपयांचा प्लॅन हा व्हॉइस-ओन्ली प्रीपेड प्लॅन आहे, म्हणजेच या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. ज्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे हवे आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आला आहे.

हा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या सेवा वैधतेसह येतो, ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 1,000 एसएमएसचा समावेश आहे. 84 दिवसांच्या वैधतेनुसार 448 च्या या प्लॅनचा दैनंदिन खर्च 5.33 आहे. कंपनी या प्लॅनसोबत ग्राहकांना जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड स्टोरेजच्या ॲक्सेससारखे अतिरिक्त फायदे देखील देते.

हा रिचार्ज प्लॅन या लोकांसाठी आहे फायदेशीर

हा रिचार्ज प्लॅन डब्बल सिम वापरणाऱ्यांसाठी किंवा ज्या ग्राहकांना डेटा नको आहे पण मोबाईल नंबर सक्रिय ठेवण्याचा असेल तर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.

एअरटेलकडे 448 रुपयांचा प्लॅन आहे का?

एअरटेलचा 449 रुपयांचा एक प्लॅन आहे, पण या किमतीत तुम्हाला कंपनीकडून 84 दिवसांऐवजी 28 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 4 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

या प्लॅनची ​​वैधता देखील कमी आहे कारण यामध्ये कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईलचा ॲक्सेस, 30 जीबी गूगल वन क्लाउड स्टोरेज, एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेमध्ये 20 हून अधिक ओटीटी, ॲपल म्युझिक, अनलिमिटेड 5जी डेटा, ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम (वैधता १२ महिने), स्पॅम कॉल्स आणि एसएमएसच्या फसव्या लिंक्स ब्लॉक करण्याची सुविधा, 30 दिवसांतून एकदा मोफत हॅलोट्यून यांसारखे उत्तम अतिरिक्त फायदे मिळतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in