• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

JIO चा फुल फॉर्म काय? अनेक वर्षांपासून वापर करणाऱ्यांनाही नाही सांगता येणार

April 21, 2026 by admin Leave a Comment


Mukesh Ambani JIO: प्रत्येक दिवशी कोट्यवधी लोक जिओ सिमचा वापर करतात. 4G आणि 5G डेटा, स्वस्त कॉलिंग, JioTV, JIOMart सारख्या सुविधांमुळे JIO ने देशात डिजिटल क्रांती आणली आहे. पण अनेक युझर्सला जिओचा फुल फॉर्म माहिती नाही. अनेक वर्षांपासून जिओचा वापर करणाऱ्या युझर्सला फुल फॉर्म विचारला तर ते संभ्रमीत होतात. कारण रिलायन्स वा मुकेश अंबानींशी या शब्दाचे काही साधर्म्य दिसत नाही. पण जिओचा अर्थ आहे तरी काय? तुम्हाला माहिती आहे का त्याचे उत्तर?

काय आहे जिओचा पूर्ण अर्थ?

Reliance Jio Infocomm Limited (RJIL) हे कंपनीचे अधिकृत नाव आहे. जिओ हे या कंपनीचे ब्रँड नाव आहे.
Reliance Industries Limited (RIL) ची ही एक सहाय्यक कंपनी आहे. ही कंपनी 2010 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2016 मध्ये या कंपनीने व्यावसायिक सेवा सुरू केली होती. कंपनीची अधिकृत साईट आणि अधिकृत दस्तावेजामध्ये JIO हा शब्द केवळ ब्रँड म्हणून वापरण्यात आला. या शब्दाचा फुलफॉर्म कधीच जाहीर करण्यात आला नाही. पण इंटरनेटवर जिओचा फुलफॉर्म Joint Implementation Opportunity असा आढळतो. अनेक साईट्स क्विज आणि सोशल मीडियातील पोस्टमध्ये हाच अर्थ सांगण्यात येतो.

J – Joint

I – Implementation

O – Opportunity

काही लोक Joint Implementation Opportunities असे पण म्हणतात. पण Reliance कंपनीने अधिकृतरित्या ते कधी मान्य केले नाही. काही ठिकाणी हे केवळ ब्रँड नाव असल्याचे म्हटले आहे. तर JIO हा इंग्लीश शब्द हा जिओ शी नामसाधर्म्य आहे. त्याचा अर्थ जगणे, राहणे असा आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने कदाचित त्यापासूनच प्रेरणा घेतली असेल. त्यामुळे नाव लक्षात ठेवणे सोपे जाते.

JIO ने कशी आणली डिजिटल क्रांती?

2016 मध्ये JIO लाँच झाल्यानंतर भारतात स्मार्टफोन, इंटरनेट युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी डेटा अत्यंत महाग होता. पण जिओने स्वस्त पॅलन आणि फ्री डेटा ऑफर दिली आणि कोट्यवधी लोक ऑनलाईन आले. आज JIO भारतातील सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क ऑपरेटर आहे. त्याचे 50 कोटींहून अधिक युझर्स आहेत. जिओ ही केवळ टेलिकॉम कंपनी नाही. तर एक डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे. जिओने एक इकोसिस्टिम तयार केली आहे. JioFiber, JioPlatforms, JioCinema, JioHealth इत्यादी आहे. Jio Platforms मध्ये Meta, Google सारख्या इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..”
  • Devendra Fadnavis UNCUT | बारामतीच्या सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव, म्हणाले दादांच्या जाण्याने…
  • वैभव सूर्यवंशीचं ते अधुरं स्वप्न, वडिलांची…पहिल्यांदाच मनातलं गुपित बोलून दाखवलं; तुम्हालाही वाटेल अभिमान!
  • शरद पवार यांची रुग्णालयातून पहिली पोस्ट, दोन दिवसानंतर काय म्हणाले? पहिल्यांदाच व्यक्त केली खंत?
  • 6 मिनिटे 7 सेकंदांचे ते गाणे… 43 वर्षांनंतरही लोक आवडीने गुणगुणतात; यूट्यूबवर 115 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in