
जिओकडे सर्वात मोठा ग्राहकवर्ग असून, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासू नये, यासाठी कंपनीने दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे.
जिओच्या 111 रुपयांच्या या प्लॅनचे नाव FLEXI YOUTH AND GAMING PACK असे आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता दिली जाते.
या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी एकूण 5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कंपनीच्या धोरणानुसार कमी होऊ शकतो.
याशिवाय या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदेही दिले जातात. ग्राहकांना 56 दिवसांसाठी गेमिंग पॅक मिळतो. त्यामुळे तरुणवर्गासाठी हा प्लॅन खास आहे.
तसेच Youth Pack अंतर्गत JioGames Mobile, FanCode आणि Snapchat+ यांसारख्या सेवांचे सबस्क्रिप्शनही दिले जाते. त्यामुळे गेमिंग आणि मनोरंजनाची आवड असलेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.




Leave a Reply