• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jasprit Bumrah : काय दिवस आले? जोफ्रा आर्चरकडून शिक, जसप्रीत बुमराहला भारताच्या मोठ्या खेळाडूचा सल्ला

May 1, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाचा हुकूमी एक्का म्हणजे जसप्रीत बुमराह. या खेळाडूच्या यशाबद्दल नेहमी चर्चा होते. पण सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये जसप्रीत बुमराहचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे. बुमराह हा डिबेटचा टॉपिक बनला आहे. मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. याचं मुख्य कारण जसप्रीत बुमराहचा फॉर्म आहे. या गोलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी बॉलिंग करता येत नाहीय. त्याला यंदाच्या सीजनमध्ये विकेटसाठी झगडावं लागत आहे. यंदाच्या सीजनमध्ये आठ सामन्यात त्याने फक्त दोन विकेट्स काढले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी बुमराहच्या फॉर्म बद्दल चिंता व्यक्त केली आहे. पावरप्ले मध्ये बुमराहच्या गोलंदाजीच्या रणनितीबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. नव्या चेंडूने तो खूप स्लोवर वन टाकत असल्याकडे श्रीकांत यांनी लक्ष वेधलं.

जोफ्रा आर्चरसारखी आक्रमकता दाखवं अशी श्रीकांत यांनी बुमराहला विनंती केली आहे. “तुमच्या हातात नवीन बॉल आहे. समोर दोन लेफ्टी बॅट्समन आहेत आणि बुमराह इतके स्लोवर वन टाकतो. नव्या चेंडूने इतके स्लोअर वन टाकण्याचा काही उपयोग नाही. मागच्या काही सामन्यात आर्चर काय करण्याचा प्रयत्न करतोय ते बघा. तो पूर्ण वेगात चेंडू टाकतोय. त्यामुळे फलंदाज यष्टीपाठी किंवा स्लीपमध्ये कॅच आऊट होतायत. बुमराहने सुद्धा असचं करण्याचा प्रयत्न करावा” असं श्रीकांत युट्यूब चॅनलवर म्हणाले.

तो खूप प्रयत्न करतोय पण सामान्य वाटतोय

राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा जोफ्रा आर्चर या सीजनमध्ये फॉर्ममध्ये आहे. नऊ सामन्यात त्याने 14 विकेट्स काढलेत. “बुमराह 100 टक्के त्याच्या बाजूने प्रयत्न करत असावा पण ते मैदानावर प्रतिबिंबित होत नाहीय. कदाचित तो थकला असावा” असं श्रीकांत म्हणाले. “बुमराहमध्ये तो जोश दिसत नाहीय. त्यांचा एक चेंडू धोकादायक वाटत नाही. तो थकला असावा. मी त्याला दोष देत नाहीय. पण तो त्याच्या बेस्ट फॉर्ममध्ये नाहीय. तो खूप प्रयत्न करतोय पण सामान्य वाटतोय” असं श्रीकांत म्हणाले. विकेट मिळत नसले तरी मुंबईच्या बॉलर्समध्ये त्याचा इकोनॉमी रेट चांगला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: आपसे बायबल के बारें में बात करनी थी…बोरिवलीमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
  • आता ट्रेनमध्ये मिळणार विमानासारखी सुविधा, रेल्वे प्रवासाचा अनुभव बदलण्याची योजना
  • महाराष्ट्र दिनी – परेवर विरार ते डहाणू पंधरा डबा लोकल सुरु,मात्र, मराठी भाषेला डावलल्याने नाराजी
  • RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वैभव सूर्यवंशी रचणार विक्रम, फक्त एक षटकार मारताच…
  • बँकेत महिला बॉसची सेक्ससाठी आपल्याच सहकाऱ्यावर जबरदस्ती, कोण आहे पिडीत तरुण चिरायु राणा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in