
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहता आणखी विक्रम त्याच्या रडारवर आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम रचू शकतो. (Photo: IPL/BCCI)
आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक षटकार मारताच त्याच्या नावावर शतकी नोंद होणार आहे. टी20 क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचा विक्रम करणार आहे. यावेळी त्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कशी होणार आहे. (Photo: IPL/BCCI)
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या 9 डावात 37 षटकार मारले आहेत. या स्पर्धेतील 38 षटकार हा खास असणार आहे. त्यामुळे आता हा विक्रम दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. असं करताना टी20 क्रिकेटमध्ये कमी वयात 100 षटकार मारणारा फलंदाज ठरेल. (Photo: IPL/BCCI)
वैभव सूर्यवंशीने 15व्या वर्षीच 99 षटकार मारले आहेत. असं करताच 19पेक्षा कमी वयात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरेल. वैभवने 27 सामन्यात 99 षटकार मारले आहेत. आता एक षटकार मारताच सर्वात कमी डावात 100 षटकार मारणारा फलंदाज ठरेल. (Photo: IPL/BCCI)
राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीत वैभव सूर्यवंशीचे मोठे योगदान मोठं आहे. आतापर्यंत नऊ डावांमध्ये 400 धावा केल्या आहेत. सर्व 10 संघांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या शर्यतीत आहे. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असून 26 धावा करताच त्याला ऑरेंज कॅप मिळेल.(Photo: IPL/BCCI)




Leave a Reply