• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बँकेत महिला बॉसची सेक्ससाठी आपल्याच सहकाऱ्यावर जबरदस्ती, कोण आहे पिडीत तरुण चिरायु राणा?

May 1, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध बँक जेपी मॉर्गन चेसच्या एका महिला बॉसविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या महिलेनं आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या मुळ भारतीय असणाऱ्या तरुणाचं यौन शोषण केल्याचा आरोप तिच्यावर आहे. या महिलेनं या तरुणाला सेक्स गुलाम बनवलं होतं, असा तिच्यावर आरोप आहे. या महिलेवर आरोप करण्यात आला आहे की या महिलेनं कंपनीमधील आपल्या पदाचा आणि ताकदीचा दुरुपयोग करून या कंपनीत काम करत असलेला आपला सहकारी चिरायु राणा याचं यौन शोषण केलं आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे या महिलेनं चिरायु राणाला व्हायग्राच्या गोळ्या खाऊ घातल्या, त्यानंतर त्याच्यासोबत बोलताना अश्लील शब्दांचा वापर केला. यामुळे घाबरलेला पीडित तरुण रडला आहे. लोर्ना हजदिनी असं या 37 वर्षीय आरोपी महिलेचं नाव आहे. तिने आपल्याच ऑफीसमध्ये काम करणाऱ्या चिरायु राणा यांच यौन शोषन केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आता तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहिती प्रमाणे 37 वर्षीय लोर्ना हजदिनी ही जेपी मॉर्गन चेस कंपनीमध्ये फायनान्स विभागात एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहे. या महिलेनं आपल्या पदाचा वापर करत एका लग्न झालेल्या तरुणाचं यौन शोषन केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील पीडित तरुण चिरायु राणा याची या सर्व गोष्टींना संमती नसताना देखील या महिलेनं त्याच्यावर बळजबरी केली. एवढंच नाही तर तुला प्रमोशन पाहिजे असेल तर तुला मला खूश करावं लागेल असंही या महिलेनं चिरायु राणा याला म्हटलं होतं.

कोण आहे चिरायु राणा?

लोर्ना हजादिनी या महिलेवर ज्या पुरुषाचं यौन शोषण केल्याचा आरोप आहे, त्याचं नाव चिरायु राणा आहे. न्यूयॉर्क पोस्टने आपल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार 35 वर्षीय चिरायु राणा सध्या ‘ब्रेगल सेजमाउंट’ या गुंतवणूक कंपनीमध्ये ‘प्रिन्सिपल’ आहे. ब्रेगल सेजमाउंटच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार चिरायु राणा हे त्या कंपनीमध्ये ‘प्रिन्सिपल’आहेत, ज्यांचं मुख्य काम सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा, वित्तीय तंत्रज्ञान, व्यावसायिक सेवा आणि ग्राहक सेवा या क्षेत्रातील गुंतवणुकीशी संबंधित आहेत. या कंपनीत जॉइन होण्यापूर्वी ते जेपी मॉर्गन चेसकंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. मात्र दुसरीकडे या बँकेनं असा दावा केला आहे, की बँकेच्या अंतर्गत चौकशीमध्ये चिरायु राणा यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य आढळून आलेलं नाहीये.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्या व्यंगचित्रावरून सुषमा अंधारेंचा प्रचंड संताप; राणे ते खोत, पडळकर ते भुजबळ एकलाही सोडलं नाही, सगळंच काढलं
  • Mumbai | कलिंगडानंतर मृत्यू प्रकरणाला नवे वळण: डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
  • भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…
  • Multibagger stock: गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा; 370 टक्क्यांची तुफान तेजी, हा शेअर कोणता?
  • शेजारील राज्यात 44 मोरांच्या मृत्यूने खळबळ, H5N1 ला दुजोरा,10 किमी क्षेत्रात कंटेनमेंट झोन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in