• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Japan earthquake : सर्वात मोठा भूकंप; तीव्र धक्कांनी लोकांची रस्त्यावर पळापळ, हादरवणारा व्हिडिओ समोर

July 28, 2026 by admin Leave a Comment


जपानमध्ये सर्वात मोठा भूकंप झाल्याचं समोर आलं आहे. तीव्र भूकंपानंतर जपानच्या दक्षिण भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या प्रदेशात गेल्या काही दिवसांत 42 भूकंपांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वात मोठा भूकंप हा ७.१ तीव्रतेचा आहे.

 

🚨 BREAKING: A massive 7.1 magnitude earthquake has struck Kumamoto, #Japan

The powerful, high-impact tremor hit at a shallow depth, centered just 4 km southeast of Uki#terremoto #Earthquake pic.twitter.com/cTUPHL0mjT

— Telugu Feed (@Telugufeedsite) July 28, 2026

जपानच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार, जपानमध्ये भूकंपाची नोंद ही कुमामोटो प्रांतात झाली आहे. जपानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे. भूकंपानंतर हवामान विभागाने त्सुनामाीचा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्र आणि किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. जपान सरकारने कुमामोटो व्यतिरिक्त क्यूशू बेटावरील नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा, ओइता आणि मियाजाकी प्रांतात भूकंपाचा इशारा दिला आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती आलेली नाही. स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. शासनाचे बचाव पथक सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सर्वाधिक भूकंप होणाऱ्या देशात जपनाचा समावेश होतो. जपानमध्ये वारंवार होणाऱ्या भूकंप आणि त्सुनामीमुळे इशारा देणारी सर्वात चांगली व्यवस्था उभारण्यात आली आहे. या सिस्टिममुळे काही सेकंदात लोकांना मेसेज जातो. त्यामुळे नागरिकांचं नुकसान कमी प्रमाणात होते. येत्या काही तासांत पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्यूशू बेटावर राहणार्‍या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. काही तासांनतर ही परिस्थिती नियंत्रणात येईल.

Live footage from Kumamoto Castle shows intense shaking and a haze of dust/smoke following a magnitude 7.1 earthquake (地震 ) that struck Kumamoto, Japan. pic.twitter.com/TAj1SqBLcH

— Weather Monitor (@WeatherMonitors) July 28, 2026

जपानचे पंतप्रधान कार्यालयाने कुमामाटो प्रांतात भूकंप झाल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांना तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानाने स्पष्ट केलं की, या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर पाहणी आणि मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित यंत्रणांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांच्या जीवनाला सर्वाच्च प्रधान्य दिले पाहिजे, या भूकंपात एखाद्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले पाहिजे. त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in