• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ishan Kishan: इशान किशनने फलंदाजीतील कमकुवत बाजूला केली धार, हा फटका मारण्यात झाला तरबेज

June 18, 2026 by admin Leave a Comment


इशान किशन दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आला आणि त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला ग्रहण लागलं. त्यामुळे त्या टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवलं. फक्त स्थान मिळवलं म्हणजे झालं असं होत नाही. त्यातही इशान किशनने सातत्यपूर्ण कामगिरी करून संघातील स्थान पक्कं केलं आहे. टीम इंडियात कमबॅक केल्यानंतर सुरुवातील टी20 फॉर्मेटमध्ये ताकद दाखवली. त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ठोकलेल्या शतकामुळे त्याला संघातून बाहेर काढणं आता कठीण झालं आहे. इशानला ऋषभ पंतच्या जागी संघात स्थान मिळालं होतं. त्याने वनडे क्रिकेटमध्ये कमबॅकच्या दुसऱ्याच सामन्यात शतक ठोकलं. त्यामुळे 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याचं स्थान पक्कं असल्याचं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सांगितलं आहे.

सुनील गावस्कर यांनी इशान किशनच्या फलंदाजीचंही विश्लेषण केलं. इशानने त्याच्या फलंदाजीतील कमकुवत बाजू सुधारली आहे. त्यामुळे त्याला रोखणं आता कठीण दिसत आहे. सुनील गावस्कर यांच्या मते, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याची कमकुवत बाजू होती. हा चेंडू खेळताना त्याला अडचण येत होती. पण त्यावर त्याने काम केलं आणि डिफेंस मजबूत केला आहे. इशान किशनने डिफेंससोबत बॅकफूट गेमही सुधारला आहे. यात असा एक शॉट खेळायला शिकला आहे की त्यामुळे तो पूर्वीपेक्षा अधिक घातक ठरत आहे. गावस्कर यांनी सांगितलं की, इशानकडे यापूर्वी लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह नव्हता. आता तो हा शॉट देखील तरबेजपणे खेळत आहे. त्यामुळे रोखणं कठीण दिसत आहे.

आयपीएल 2025 नंतर इशान किशनने तिन्ही फॉर्मेटमध्ये कमबॅक केलं आणि चांगली कामगिरी केली. लिस्ट ए, टी20 असो की फर्स्ट क्लास क्रिकेट इशानने धावांचा पाऊस पाडला. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सात सामन्यात 63.71 च्या सरासरीने 446 धावा केल्या. लिस्ट ए मध्ये 43हून अधिकच्या सरासरीने 259 धावा केल्या. टी20 क्रिकेटमधील 38 सान्यात 44हून अधिकच्या सरासरीने 1651 धावा केल्या. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. इशान किशनने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 317 धावा केल्या होत्या. त्यानंतर आयपीएल स्पर्धेत 40हून अधिकच्या सरासरीने 602 धावा केल्या. आता वनडे क्रिकेटमध्ये त्याची बॅट तळपताना दिसत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?
  • Odi Cricket : वनडेत सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?
  • WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद! पाकिस्तान संघात बरंच काही घडलं
  • पहिल्याच पावसात ढगफुटी, नदी-नाल्यांना पूर… राज्यातील या जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा
  • हे झाड आयुष्यात कधीच घराजवळ लावू नका, असतो सापांचा डेरा, तुमच्याही परिसरात आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in