• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IRS अधिकाऱ्याच्या लेकीचे शेवटचे अतीभयानक 45 मिनिटं… आरोपीने तिला खोलीत खेचलं, बेशुद्ध असताना बलात्कार आणि…

April 24, 2026 by admin Leave a Comment


Delhi IRS daughter rape-murder case: दक्षिण पूर्व दिल्लीतील अमर कॉलनी येथील एका वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणात नवीन घडामोडी समोर आल्या आहेत. आरोपी राहुल मीणा याला पोलिसांनी अटक केली आहे… 22 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, तिजोरी खोलण्यासाठी आरोपीला मुलाच्या हाताचे ठसे हवे होते. समोर येत असलेल्या माहितीनुसार, राहुल याने फक्त आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीचाच नाही तर, त्याच्या घराजवळ राहणाऱ्या विवाहित महिलेचा देखील बलात्कार केला आहे… पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

रिपोर्टनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीची हत्या केल्यानंतर कपाटातून 2.5 लाख रुपये लंपास केले. चोरीचा गुन्हा आरोपीने कबूल देखील केला आहे. पोलिसांच्या सुत्रांनुसार, स्टडीरुममध्ये अभ्यास करत असलेल्या मुलीला आरोपीने खोलीत खेचत आणलं, त्यानंतर जड वस्तूने तिच्यावर वार केल्याने मुलगी बेशुद्ध झाली. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे देखील आरोप आहेत.

त्यानंतर आरोपीने मुलीच्या फिंगरप्रिंट्सच्या मदतीने तिजोरी खोलण्याचा प्रयत्न केला. पण मुलीचे पूर्ण हात रक्ताने भरलेले होते. म्हणून बायोमेट्रिक काम करत नव्हतं. पण आरोपीने तिजोरी उघडली. रिपोर्टनुसार, तिजोरी उघडल्यानंतर त्याने पैसे आणि दागिने बाजूला पडलेल्या बॅगेत भरले… आरोपीच्या कपड्यांना रक्त लागलेलं असल्याने त्याने मुलीच्या भावाचे कपडे घातले आणि फरार झाला.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल ऑनलाईन गेम ‘3 पत्ते’ खेळायचा आणि पैसे कमवायचा… एवढंच नाही तर, त्याचे अनेक महिलांसोबत देखील संबंध होते. गेम खेळून तो पैसे कमवायचा आणि पैसे देऊन मुलींना घरी बोलवायचा. ही सवय राहुल याला महागात पडली. त्याने 21 एप्रिल रोजी बाजूला राहत असलेल्या विवाहित महिलेचा देखील बलात्कार केलेला. त्यानंतर तो दिल्लीत आला आणि जुन्या मालकाच्या मुलीचा बलात्कार त्यानंतर तिची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या जुगाराच्या व्यसनामुळे आयकर अधिकाऱ्याने त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. आता सीसीटीव्ही फुटेज आणि काही पुराव्यांच्या आधारावर पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Aishwarya Rai: बिल गेट्सना कंपनी विकणाऱ्या श्रीमंत व्यक्तीची बायको असती ऐश्वर्या पण…, 5 सेलिब्रिटींसोबत होते प्रेमसंबंध
  • आप पक्षात महाभूकंप, राघव चड्ढासह 7 खासदार भाजपात; देशाच्या राजकारणात मोठी खळबळ!
  • लहान की मोठा… कोणत्या नारळात जास्त पाणी असतं, तुम्हाला माहितीये?
  • एका बापाची अवलाद असेल तर 4 तारखेला… MNSचं खुलं आवाहन, रिक्षाचालकाच्या संपामुळे टेन्शन वाढलं
  • पराभवानंतर नाचतोय..गर्लफ्रेंडला इशारे करतोय! हार्दिक पांड्याला काय झालंय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in