• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पराभवानंतर नाचतोय..गर्लफ्रेंडला इशारे करतोय! हार्दिक पांड्याला काय झालंय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

April 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाची हाराकिरी सुरूच आहे. सलग चार पराभवानंतर विजयाची चव चाखली होती. पण पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले जात आहे. संघ अपयशी ठरत असताना हार्दिक पांड्याचं मैदानाबाहेरील वागणं काही नेटकरी आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना भावलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 104 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे 2 गुण तर गेलेच वरून नेट रनरेटही खालावला आहे. असं असताना हार्दिक पांड्याची कृती पाहून चाहत्यांचा संताप झाला आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना गमवल्यानंतरचे असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. या व्हायरल व्हिडीओत मैदानातून गर्लफ्रेंडशी संवाद आणि नाचणं, हे काही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आवडलेलं नाही.

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

व्हायरल व्हिडीओतील दाव्यानुसार, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना 103 धावांनी गमावल्यानंतर सर्व कॅमेरे हार्दिक पांड्यावर होते. यावेळी मैदानातून हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड माहिकासोबत काही बोलताना दिसला. तिथे हार्दिकचा मुलगा अगस्त्याही उपस्थित होता. हार्दिक पांड्याने माहिकाला घरी गेल्यावर फोन कर असा इशारा केला. एकीकडे मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव झाला असताना त्याचं त्याला काहीच देणं घेणं नाही असा आरोप सोशल मीडियावर नेटकरी करत आहेत.

Hardik Pandya taking care of his girlfriend and son after the match. pic.twitter.com/xFlQD4O0pD

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 23, 2026

दुसरीकडे, आणखी एक व्हिडीओ सामन्यानंतर चित्रित केल्याचा दावा नेटकरी करत आहेत. यात सीएसकेकडून दारूण पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्या एका गाण्यावर नाचताना दिसला. एक जबाबदार कर्णधार असं कसं वागू शकतो, अशी टीका नेटकरी करत आहेत. त्याला मुंबई इंडियन्सच्या घसरणीचं काहीच गांभीर्य नसल्याचे सांगत ट्रोल केलं जात आहे.

From gentleman captains like Sachin Tendulkar, Ricky Ponting, and Rohit Sharma to Chapri Hardik Pandya, unreal downfall of my beautiful franchise 💔 pic.twitter.com/FNAM4jDKdg

— TEJASH 🚩 (@LoyleRohitFan) April 24, 2026

चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात हार्दिकची कामगिरी सर्वात खराब होती. त्याने दोन षटके गोलंदाजी केली आणि 38 धावा दिल्या. संघ फलंदाजीत संघर्ष करत होता, तेव्हा तो मैदानात आला आणि 2 चेंडूंमध्ये फक्त एक धाव करून बाद झाला. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 29 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हा सामना खरं करो या मरोची लढाई असणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर प्लेऑफचं गणित आणखी लांबेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Arvind Kejriwal Tweet | भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
  • Mumtaz : महिला त्या हिरोच्या शरीराकडे आकर्षित व्हायच्या, पण आमच्या दोघांमध्ये..अभिनेत्री मुमताज यांनी जाहीरपणे जे होतं ते सांगितलं
  • ‘राईट मॅन इन राँग पार्टी’, राघव चढ्ढा यांच्या एका निर्णयाने केजरीवालांची झोपच उडाली
  • ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक
  • भारतापुढे सर्वात मोठं संकट, एका निर्णयामुळे हजारो कोटी बुडणार… 60 टक्के व्यापार संकटात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in