
आखातामध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवर हल्ले सुरु केले आहेत. अमेरिकेने इराणवर पहिला हल्ला केला. त्यानंतर इराणने प्रत्युत्तराची कारवाई केली. जोरदार मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. सगळ्या आखातामध्ये पुन्हा एकदा तणाव पसरला आहे. हल्लेखोरांना पश्चाताप होईल असं उत्तर आम्ही दिलय असं इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटलं आहे. जॉर्डनमधल्या अमेरिकी बेसला बॅलेस्टिक मिसाइलने टार्गेट केलं. बहरीनमधील अमेरिकी बेसवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आले. इराणकडून डागण्यात आलेली 13 ते 20 बॅलेस्टिक मिसाइल्स आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केली, असं जॉर्डनकडून सांगण्यात आलं. तीन मिसाइल्स लोकवस्तीच्या जागेपासून लांब दूरवर पडली. दुसरीकडे कुवैतने म्हटलय की, इराणच्या ड्रोन हल्ल्याला आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमने सडेतोड प्रत्युत्तर दिलय.
अमेरिकन सैन्याने मंगळवारी दोन दिवसात दुसऱ्यांदा इराणवर हल्ला केला. हॉर्मुज स्ट्रेट जवळ असलेल्या IRGC च्या ठिकाणांना लक्ष्य केलं. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोमवारी रात्री उशिरा इराणच्या दक्षिणेला होर्मोजगन प्रांतातील सिरिक काउंटी कुहेस्ताकमध्ये एक घराला अमेरिकी मिसाइलने लक्ष्य केलं. तिथे लग्न सोहळा चाललेला. या हल्ल्यात एकालहान मुलासह कमीत कमी 5 जणांचा मृत्यू झाला. 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. इराणच्या रेड क्रिसेंटने म्हटलं की, मिसाइलचे तुकडे घरावर पडले. हल्ल्यातील काही जखमींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. काहींना चांगल्या उपचारासाठी मिनाब हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलय.
IRGC चा दावा काय?
आमच्या हल्ल्यात अनेक अमेरिकी सैनिक मारले गेलेत असा IRGC चा दावा आहे. अमेरिकेकडून या दाव्याची पुष्टि करण्यात आलेली नाही. अमेरिकेने इराणचे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकी सेंट्रल कमांड CENTCOM च्या स्टेटमेंटमध्ये एकही अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचा उल्लेख नाहीय. इराणने व्यावसायिक जहाज आणि अमेरिकन सैनिकांवर हल्ले केल्यानंतर या कारवाईची सुरुवात झाली असं अमेरिकेचं म्हणणं आहे. अमेरिकेने इराणमधील क्वेश्म आयलँड, बंदर अब्बास, चाबहार, जास्क, सिरिक, असलुयेह, कोनारक आणि लावन मध्ये हल्ले केले.
Leave a Reply