• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Qualifier 2 हैदराबादनंतर गुजरातचा नंबर! वैभव सूर्यवंशी शुबमनसेनेची धुलाई करणार? पाहा आकडे

May 29, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार हे क्वालिफायर 2 सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 मे रोजी क्वालिफायर 2 सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत संघाचं इथेच आव्हान संपेल. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या निमित्ताने वैभवची गुजरात विरुद्ध कशी कामगिरी राहिलीय हे जाणून घेऊयात.

राजस्थानने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करुन क्वालिफायर 2चं तिकीट मिळवलं आहे. तर गुजरात टॉप 2 मध्ये असल्याने क्वालिफायर 1 मधील आरसीबी विरूद्धच्या पराभवानंतरही त्यांना अंतिम फेरीत पोहचण्याची ही 1 अतिरिक्त आणि शेवटची संधी आहे. त्यामुळे गुजरात दुसऱ्या फेरीत तरी फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

वैभवमुळे गुजरात टायटन्स टीमला टेन्शन

वैभवने राजस्थानला क्वालिफायर 2 मध्ये पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. वैभवने 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध फक्त 29 बॉलमध्ये 97 रन्स केल्या. त्यामुळे गुजरातला जिंकायचं असेल तर वैभवला झटपट रोखण्याशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट आहे.

वैभव सूर्यवंशीची आकडेवारी

वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. वैभवने या मोसमातील 15 सामन्यांमध्ये एकूण 680 धावा केल्या आहेत. यामध्ये एलिमिनेटर सामन्यातील 97 धावांचा समावेश आहे. त्यामुळे राजस्थान टीम मॅनेजमेंटला वैभवकडून गुजरात विरुद्धही अशीच मोठी खेळी अपेक्षित असणार आहे.

गुजरात-राजस्थान तिसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान क्वालिफायर 2 निमित्ताने दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 2 वेळा भिडले होते. वैभवने पहिलव्या सामन्यात 18 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यातही वैभवने जबरदस्त सुरुवात केली होती. वैभवने गुजरात विरूद्धच्या 19 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात 16 बॉलमध्ये 36 रन्स केल्या होत्या. वैभवने त्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. त्यामुळे गुजरात टीम वैभवला तिसऱ्या सामन्यात विस्फोटक सुरुवात करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in