• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Qualifier 2 : गुजरातकडून वैभवची ‘फिल्डिंग’ सेट, ओपनरला रोखण्यासाठी मास्टर प्लान, कोच पार्थिव पटेल म्हणाला…

May 28, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशी याने बुधवारी 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. वैभवने अवघ्या 29 बॉलमध्ये 97 रन्स केल्या. वैभवने केलेल्या या खेळीमुळे राजस्थानला हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवता आलं. हैदराबादला प्रत्युत्तरात 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने अशाप्रकारे 47 धावांनी सामना जिकंला. हैदराबाद विरुद्ध 97 धावा करणारा वैभव सूर्यवंशी हा सामनावीर ठरला. वैभवने राजस्थानच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. वैभव 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. वैभव प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. मात्र प्रतिस्पर्धी संघांना अपवाद वगळता वैभवला झटपट रोखण्यात यश आलेलं नाही. मात्र गुजरात टायटन्सने वैभवची क्वालिफायर 2 आधी फिल्डिंग सेट केली आहे. वैभवला रोखण्यासाठी आमचा प्लान तयार असल्याचं गुजरात टायटन्सचा सहाय्यक कोच पार्थिव पटेल यांनी म्हटलं आहे. पार्थिव पटेल यांनी नक्की काय म्हटलं? जाणून घेऊयात.

पार्थिव पटेल यांनी काय म्हटलं?

क्वालिफायर 2 सामना हा शुक्रवारी 29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आयपीएल ट्रॉफीसाठी गतविजेता आरसीबी विरुद्ध 2 हात करणार आहे. तर पराभूत संघाचं इथेच पॅकअप होईल. त्यामुळे गुजरातने वैभवला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. क्वालिफायर 2 सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत पार्थिव पटेल यांनी उत्तर देताना वैभवला रोखण्याबाबतच्या प्लानबाबत प्रतिक्रिया दिली.

“वैभव ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तो पाहता फार चांगलं वाटतंय. आम्ही त्याला झटपट आऊट करण्यात यशस्वी होऊ अशी आशा आहे. दुसऱ्या संघांनीही वैभवला झटपट आऊट करण्यासाठी प्लान केला होता. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. आम्ही वैभवच्या बॅटिंगचे व्हीडिओ पाहिले आहेत. आम्ही त्याच्या विरुद्ध प्लानची अंमलबजावणी करण्यात यशस्वी ठरु असा विश्वास आहे”, असं पार्थिव यांनी स्पष्ट केलं.

“वैभव प्रतिभावान खेळाडू”

“मी गेल्या वेळेस बोललो होती की आपल्याला त्याच्या वयावर भाष्य करणं बंद करायला हवं. तो एक प्रतिभावान फलंदाज आहे. तो ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ते पाहताना सर्वांनाच चांगलं वाटतंय. मात्र प्रतिस्पर्धी संघ म्हणून आमचा त्याला क्वालिफायर 2 सामन्यात सहजासहजी धावा न देण्याचा प्रयत्न असणार आहे”, असंही पार्थिवने म्हटलं. आता गुजरात टायटन्सचे गोलंदाज या प्रयत्नात किती यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वैभवच्या सर्वाधिक धावा

दरम्यान वैभव सूर्यवंशी  19 व्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. वैभवने 15 सामन्यांमध्ये एकूण 680 धावा केल्या आहेत. वैभव सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानी विराजमान आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in