• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Playoff: आयपीएलच्या चौथ्या जागेसाठी चार संघ शर्यतीत, असं आहे समीकरण

May 22, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 66 सामन्यांचा खेळ संपला आहे. आतापर्यंत झालेल्या या सामन्यात तीन संघांची प्लेऑफमध्ये, तीन संघ या स्पर्धेतून आऊट झाले आहे. त्यामुळे प्लेऑफच्या एका जागेसाठी चार संघात चुरस आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. तर मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. आता चौथ्या जागेसाठी राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस आहे. आता या चार संघाचं प्लेऑफसाठीचं गणित कसं आहे ते समजून घेऊयात..

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये खेळण्याची सर्वाधिक संधी आहे. राजस्थान रॉयल्सने 13 सामन्यात 7 विजय मिळवून 14 गुणांची कमाई केली आहे. आता राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून एक विजय दूर आहे. राजस्थान रॉयल्सचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना जिंकला तर प्लेऑफचं तिकीट मिळेल. पण हा सामना गमावला तर पंजाब किंग्स आणि केकेआरला संधी मिळेल.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. पंजाब किंग्सने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे 13 गुण आणि +0.227 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. पंजाबचा शेवटचा लखनौ विरुद्ध होत आहे. हा सामना जिंकणं भाग आहे. पण जिंकल्यानंतरही पंजाबचं प्लेऑफचं गणित राजस्थान रॉयल्स आणि केकेआरवर अवलंबून आहे. या दोन्ही संघांनी शेवटचा सामना गमावला तर पंजाबला संधी मिळेल.

कोलकाता नाईट रायडर्स

केकेआरचं गणितही पंजाब किंग्ससारखं आहे. केकेआरने आतापर्यंत 13 गुणांची कमाई केली आहे. पण केकेआरचा नेट रनरेट हा पंजाबपेक्षा कमी आहे. त्यामुळे सहाव्या स्थानावर आहे. केकेआरचा नेट रनरेट हा +0.011 आहे. त्यामुळे केकेआरला शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासोबत राजस्थान रॉयल आणि पंजाब किंग्सच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. जर तसं झालं तर प्लेऑफचं तिकीट मिळेल. केकेआरचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत आहे.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीत काठावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचं प्लेऑफचं गणित इतर तीन संघाच्या पराभवावर अवलंबून आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. इतकंच काय तर केकेआरला शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. तसं झालं तर दिल्ली कॅपिटल्स नेट रनरेटच्या बाबतीत राजस्थान रॉयल्सच्या पुढे निघून जाईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in