• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : लोकांकडून फोनवरून शिव्या… आयपीएलमधील खेळाडूची बहीणही झाली ट्रोल, Video तून व्यक्त केला संताप

May 26, 2026 by admin Leave a Comment

Shreyas Iyer On Online Abuse : आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सचा संघ हा प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. एखाद्या संघाच्या पराभवानंतर त्यातील एखळाडूमना टीका सहन करावी लागते, वेलप्रसंगी ते ट्रोलही होतात, पण हीच गोष्ट त्यांच्या कुटुंबियांना सहन करावी लागली तर ? असंच काहीस घडलं ते पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या बहिणीबाबात. तिचा एका जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयसची बहीण, श्रेष्ठा ही पंजाब किंग्सच्या काही समर्थकांसोबत दिसत आहे. ही घटना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यादरम्यान घडली होती. मुसळधार पावसामुळे संपूर्ण सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर लगेचच, श्रेष्ठाने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती आणि पंजाबचे समर्थक नाचत केकेआरसाठी तो एक गुण “देणगी” म्हणत हिणवताना दिसत होते. मात्र यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यालाच प्रत्युत्तर म्हणून, श्रेष्ठा अय्यरने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारे स्वतःचे दोन व्हिडिओ प्रसिद्ध केले.

श्रेयस अय्यरची बहीण ट्रोल

सतत ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर, श्रेष्ठा अय्यरने आता सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने ट्रोलर्सवर राग व्यक्त केला आहे. ” आता तुझ्याकडे काहीच उरले नाही का? असं लोकं विचारत आहेत. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही एका लहानशा गोष्टीचा, मी बनवलेल्या एका व्हिडिओचा, एवढा मोठा मुद्दा बनवला. पण माझ्या मते, ती फक्त एक गंमतीशीर थट्टा होती, ट्रोलिंग नव्हतं. त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. मी फक्त माझ्या भावाच्या टीमला पाठिंबा देत होते. पण याचा अर्थ असा नाही ना की मी कोणत्याही टीमच्या खेळाडूचा द्वेष करते. मला सर्व खेळाडूंबद्दल खूप आदर वाटतो, कारण माझा भाऊदेखील क्रिकेटर आहे ” असं तिने या व्हिडीओमधून डायरेक्ट सुनावलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shresta Iyer (@shrestaiyer29)

सुनावले खडेबोल

यावेळी श्रेष्ठाने फ्रस्ट्रेटेड आणि जॉबलेस यूजर्सवरही कडाडून टीका केली. असे लोक तिच्या कमेंट सेक्शनमध्ये अत्यंत अश्लील मेसेज पोस्ट करत आहेत. एवढंच नव्हे तर ते तिच्या ऑफीसमध्ये फोन करून तिचे सहकारी, विद्यार्थी आणि कुटुंबीयांनाही शिवीगाळ करतात. वेळ काळ न पाहात कोणत्याही वेळ फोन करून तिचा छळ करतात, असा आरोप तिने लावला आहे. ‘जेव्हा कधी एखाद्या क्रिकेटरचा संघ हरतो, तेव्हा तुम्ही त्याच्या कुटुंबीयांना दोष देता. चाहते संघाच्या पराभवासाठी खेळाडूंच्या पत्नींना किंवा बहिणींना दोष देतात. जिंकणे किंवा हरणे हा खेळाचाच एक भाग आहे. जेव्हा कधी माझा भाऊ जिंकेल, तेव्हा मी आनंद साजरा करेन’ असे खडेबोल श्रेष्ठाने ट्रोलर्सना सुनावले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shresta Iyer (@shrestaiyer29)

पंजाब किंग्स प्लेऑफमधून बाहेर

आयपीएल 2026 च्या सीझनमध्ये पंजाब किंग्सने सुरूवात तर शानदार केली होती. पहिल्या सात सामन्यांमध्ये पंजाबचा संघ अपराजित राहिल्याने, तो सातत्याने अव्वल स्थानी होता. मात्र, अचानक त्यांच्या कामगिरीत मोठी घसरण झाली. पंजाब किंग्सने सलग सहा सामने गमावले, ज्यामुळे त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश कठीण झाला. पंजाब किंग्सने आपला शेवटचा साखळी सामना जिंकला असला तरी, प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना 15 गुण पुरेसे ठरले नाहीत आणि ते बाहेर पडले.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in